मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये दुचाकी चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास दोघा चोरट्यांनी न्यायालयाजवळच्या बजरंग डेअरी समोरील पार्कींग जवळ लावलेली दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली. ही सर्व चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. मालेगावमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून कधी चारचाकी गाडीची चोरी होते.आता पुन्हा दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे.