मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात प्रत्येकालाच आपल्याकडे स्वतःची बाईक असावी, असे वाटते. कारण सार्वजनिक वाहतूक सध्या खूपच महाग झाली असून त्यातच एसटी बसचा संप सुरू असल्याने वाहतुकीसाठी किंवा प्रवासासाठी खूपच अडचणी निर्माण होतात. त्यातच पेट्रोल महाग झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
एका रिपोर्ट्सनुसार भारतात पेट्रोलच्या किमती आणखी वाढणार आहेत. अशा परिस्थितीत नागरिक अधिक मायलेज देणारी मोटरसायकल घेण्याचा विचार करत आहेत. आपण उत्तम मायलेज मोटरसायकलबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एकदा पेट्रोलची टाकी भरली की ही बाइक मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते नागपूर तसेच दिल्ली ते श्रीनगर इतके मोठे अंतर कापेल.
Bajaj CT 100 ही लॉन्च झाल्यापासून भारतात सर्वाधिक विकल्या जाणार्या मोटारसायकलींपैकी एक आहे. ARAI नुसार ते 89 kmpl चा मायलेज देते. त्याची इंधन टाकी 10 लिटरची आहे. अशा परिस्थितीत, इंधन टाकीची क्षमता आणि मायलेजनुसार, एकदा टाकी भरली की ती 890 किमीपर्यंत प्रवास करू शकते.
एका रिपोर्टनुसार Bajaj CT100 चे मायलेज 89 kmpl आहे. हे 102 cc DTSi इंजिनसह येते जे सुमारे 8 hp पॉवर आणि 8.34 Nm टॉर्क जनरेट करते. त्याची किंमत 53,696 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही आधुनिक मोटरसायकल अतिशय साध्या डिझाइनसह देण्यात येते.
यात सिंगल-पीस सीट, हॅलोजन लाइट, फुल बॉडी ग्राफिक्स, अलॉय व्हील आणि कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम (CBS) सारखी वैशिष्ट्ये आहेत. ही ब्लॅक, रेड आणि ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये बाजारात येते. जास्त मायलेज असलेल्या बाईकमध्ये कमी पॉवरचे इंजिन असते. बजाज किंवा इतर कंपन्यांच्या बाइक्स ज्यांचे मायलेज चांगले आहे, त्यांचे इंजिन 100cc किंवा त्याहून अधिक आहे. कमी इंजिन पॉवरमुळे इंधनाचा वापर कमी होतो. त्यामुळे मायलेज चांगले मिळते.