मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, उद्यापासून २ हजारची नोट बँक खात्यात जमा वा बदलविता येणार आहे. मात्र, जनधन खात्यात २ हजारची नोट जमा न करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, काळे धन असलेले अनेक जण या जनधन खात्यात २ हजारची नोट जमा करणार आहे. अशा वापरकर्त्यांवर आयकर विभागाची नजर असणार आहे.
२०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीच्यावेळी बराच गोंधळ उडाला होता. अनेकांनी जनधन खात्यांचा आधार घेत जुन्या नोटा जमा केल्या होता. यंदा असा प्रकार घडू नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खात्यात संशयस्पद व्यवहार झाल्यास बँक रिपोर्ट करणार आहे. एका सरकारी बँकेतील अधिकाऱ्यानुसार, आयकर विभागाकडून सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. जनधन खात्यांवर विभागाची करडी नजर आहे.
जर कुठल्याही जनधन खात्यात संशयास्पद व्यवहार झाले तर त्याचा रिपोर्ट आयकर विभागाकडे जाणार आहे. सध्या देशात बहुतांश लोकांकडे जनधन खाते आहे. समाजातील सर्व लोकांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी काही वर्षापूर्वी जनधन खाते उघडण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यामुळे देशातील अनेव गरीब कुटुंबातील प्रत्येकाकडे किमान १ जनधन खाते आहे. या खातेधारकांचा वापर स्वार्थासाठी करून काहीजण २ हजारांच्या नोटा बदलण्याचा प्रयत्न करतील अशी शंका अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे या खात्यांवर आयकर विभागाची करडी नजर आहे.
तपास यंत्रणा अलर्ट
आयकर विभागाचे अधिकारी सतर्क राहिले असून जन धान खातेधारकांचा २ हजारांची नोट बदलण्यासाठी वापर होण्याची शंका विभागाला आहे. जर कुणाच्या घरी २ हजारांच्या काही नोटा असतील आणि बँकेत जमा करत असतील तर त्यांची चौकशी होणार नाही. परंतु जर कुणी गरीब अथवा जनधन खातेधार मोठ्या प्रमाणात बँकेत २ हजाराची नोट जमा करत असेल तर त्याची चौकशी केली जाईल. या लोकांवर ठेवण्यासाठी बँक कर विभाग आणि तपास यंत्रणाचे अधिकारी अलर्टवर आहेत.
Two Thousand Notes Bank Deposition Alert