इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहलगाम हल्ल्यातील दोन दहशवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केल्याचे वृत्त आहे. ऑपरेशन महादेव अंतर्गत ही कारवाई केली. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. त्यात २६ जण ठार मारले गेले होते. तेव्हापासून या दहशवाद्यांचा शोध सुरु होता. दरम्यान सोमवारी सुरक्षा दलांनी दहशवाद्यांना ठार मारले.
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशवादी आसिफ फौजी (कोडनेस मुसा), सुलेमान शाह (युनुस) आणि अबू तल्हा (आसिफ) यांचा सहभाग होता. इतर दोन दहशवादी आदिल गुरु आणि अहसान हे स्थानिक दहशवादी होते. ठार झालेल्या दहशवाद्यांमध्ये सुलेमान, यासिर आणि अली यांचा समावेश आहे. हल्ल्यात या दोघांचा सहभाग होता.