इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात दररोज अतिशय भीषण असे रस्ते अपघात होत असतात. तामिळनाडूतील दोन खासगी बसचा अपघात आता समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा अपघात मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सालेम जिल्ह्यात महामार्गावर धावणाऱ्या दोन खासगी बस समोरासमोर धडकल्या. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. धडकेनंतर एक बस एका झाडावर जाऊन आदळली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ३० प्रवाशांना घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ५७ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी बस यांचा हा अपघात आहे.
https://twitter.com/ANI/status/1526796340092555264?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1526796340092555264%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Fthe-shocking-video-viral-of-the-bus-accident-the-bus-came-in-front-driver-blown-in-the-air-a653%2F