इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ते अनेक बदल करत आहेत. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मालक म्हणून पहिल्याच आठवड्यात त्यांना अनेक मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागले आहे. असे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, ट्विटरवर ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांना मासिक शुल्क भरावे लागणार का, अशी चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. आता इलॉन मस्क यांनीच स्वतः यावर भाष्य केले आहे. वापरकर्त्यांना किती पैसे खर्च करावे लागतील हे त्यांनी सूचित केले आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
वास्तविक, स्टीफन किंग नावाच्या एका लेखकाने ब्लू टिकबद्दल ट्विट केले, ज्याला मस्कने उत्तर दिले. स्टीफनने लिहिले, “ब्लू टिक ठेवण्यासाठी महिन्याला २० डॉलर द्यावे लागतील? त्यांनी (ट्विटर) मला पैसे द्यावेत. जर हे खरे असेल तर मी एनरॉनप्रमाणेच निघून जाईन.” स्टीफनच्या या ट्विटला एलोन मस्क यांनी उत्तर दिले. त्यांनी लिहिले, “आम्हाला आमची बिले देखील भरावी लागतील. ट्विटर फक्त जाहिरातदारांवर अवलंबून राहू शकत नाही. ८ डॉलर ही योग्य रक्कम आहे का?, असा सवालही मस्क यांनी विचारला आहे.
इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्याचप्रमाणे, कूचे सह-संस्थापक अपम्या राधाकृष्णन यांनी ब्लू टिक संदर्भातल्या अटकळांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कु पडताळणी बॅजसाठी दरमहा १६०० रुपये आकारणार नाही.” तसेच, त्यांनी कू अॅपवर जाण्याचे आवाहन केले. कु अॅप हे ट्विटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जे काही वर्षांपूर्वी सुरू झाले आहे.
धडाधड निर्णय
ट्विटर कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरच्या नवीन मालकाने संचालक मंडळ बरखास्त केले आहे आणि स्वतःला मंडळाचा एकमेव सदस्य बनवले आहे. मस्कने नंतर ट्विटरवर सांगितले की नवीन बोर्ड व्यवस्था तात्पुरती होती, परंतु कोणताही तपशील प्रदान केला नाही. तो वापरकर्त्यांसाठी पेमेंट-आधारित ‘व्हेरिफिकेशन’ची शक्यता देखील शोधत आहे.
दरम्यान, ट्विटरच्या नवीन गुंतवणूकदारांबद्दल आणि कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या शक्यतेबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे. मस्क यांनी भारतीय वंशाचे तंत्रज्ञान कार्यकारी श्रीराम कृष्णन यांना त्यांच्या संघात सामील केले आहे. कृष्णन यांनी ट्विट केले की, ते काही इतरांसह मस्क यांना ट्विटरसाठी तात्पुरती मदत करत आहेत. “माझा विश्वास आहे की ही एक अतिशय महत्त्वाची कंपनी आहे आणि ती जगावर खोलवर प्रभाव टाकू शकते आणि त्यामागील व्यक्ती अॅलन आहे,” असे ते म्हणाले.
We need to pay the bills somehow! Twitter cannot rely entirely on advertisers. How about $8?
— Elon Musk (@elonmusk) November 1, 2022
Twitter Blue Tick Monthly Charges Elon Musk