खासदार गोडसेंच्या निधीतून उभारलेल्या लॅबमध्ये आजवर सव्वा लाख रुग्णांची मोफत तपासणी
नाशिक : कोरोना संसर्ग आजाराने जगभर थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना कोरोना तपासणीसाठी खाजगी रुग्णालयात सुमारे बाराशे रुपये खर्च येतो. मात्र खासदार हेमंत गोडसे यांनी स्वत:च्या संपूर्ण एक कोटी रुपयांच्या निधीतून नाशिक जिल्हा रुग्णालयात उभारलेल्या कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये गेल्या नऊ महिन्यात जवळपास सव्वा लाख नागरिकांची मोफत कोरोना टेस्टिंग करण्यात आल्याने नाशिकरांचे जवळपास साडेबारा कोटी रुपये वाचले आहेत.
गेल्यावर्षी ७ ऑगस्ट रोजी खासदार गोडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा रुग्णालयात तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीतून कोरोना टेस्टिंग लॅबचे लोकार्पण करण्यात आले होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन करण्यात आले होते. कोरोनाची चाचणी करण्यासाठी इतरत्र साधारण बाराशे रुपये खर्च येतो. मात्र खा. गोडसे यांनी उभारलेल्या या लॅबमध्ये संपूर्ण चाचणी मोफत करण्यात येते. त्यामुळे आतापर्यन्त तब्बल साडेबारा कोटी रुपयांचा आर्थीक खर्च वाचला आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब असावी, असे निर्देश दिले होते. या निर्देशानंतर खा. गोडसे यांनी तात्काळ स्वत:च्या स्थानिक विकास निधीतून ही लॅब उभारली.
स्वॅब तपासणीसाठी धुळे, पुणे येथे पाठवावे लागत होते. मात्र लॅब कार्यान्वित झाल्यापासून स्वॅब तपासणी इथेच होत असल्यामुळे रिपोर्ट येण्यात गती प्राप्त झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग आजाराने थैमान घातल्याने रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे या लॅबमध्ये दररोज जवळपास पाचशे तर सातशे रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात अूसन रविवार (दि.२) पर्यंन्त तब्बल १२५८५९ स्वॅब तपासरणीसाठी घेतले असून त्यातील ३४९८९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे लॅबचे मायक्रो बायोलाजिस्ट पी. गांगुर्डे यांनी दिली. या मोफत तपासणीमुळे आजवर जवळपास साडेबारा कोटी रुपये वाचले आहेत. खा. गोडसे यांनी उभारलेल्या या टेस्टिंग लॅबमुळे खऱ्या अर्थाने गोरगरीबांच्या आर्थीक खर्च वाचल्याने शहरासह जिल्हावासियांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
……………………….
आजवरचा लॅबमधील स्वॅब तपासणीचा तपशील
दिनांक २ मे पर्यंन्त
एकूण तपासणीसाठी घेतलेले स्वॅब : १२५८५९
पॉझिटिव्ह आलेले स्वॅब : ३४९८९