मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे एक ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दोन दिवसापूर्वी केलेल्या या ट्विटमध्ये पवार यांनी इंधन दरवाढीची भीती व्यक्त केली होती. त्यात म्हटले होते की, चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा वाढता की काय…त्याचबरोबर जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असे वाटू लागले आहे. त्यानंतर खरंच हे दर वाढले. त्यानंतर आज रोहित पवार यांनी पुन्हा ट्विट केले. त्यात जी भीती होती, ती अखेर खरी ठरली, असे विधान केले.
देशात पाच राज्याच्या निवडणुका असल्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ होऊ नये. यासाठी विशेष काळजी घेतली. त्यामुळे निवडणूक काळात ही दरवाढ कोठेही दिसली नाही. ही दरवाढ झाली असती तर विरोधकांना आयता मुद्दा मिळाला असता. त्यामुळे त्याचा फटका भाजपला बसला असता. पण, निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ झाल्यामुळे आता भाजप विरोधी पक्षांनी त्यावर निशाना साधला आहे.
अशी झाली दरवाढ
२७ फेब्रुवारी पासून कोणतीही इंधन दरवाढ झाली नाही. त्यानंतर उलट चार वेळा दरात कपात झाली. पण, निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ झाली. त्यामुळे रोहित पवार यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली. त्यामुळे नेटक-यांनी हे ट्विट चांगलेच व्हायरल केले आहे.
चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय! pic.twitter.com/qGPEv6GDLX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 2, 2021