इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची अनधिकृत रिसॉर्टवर पार्टी रंगली, आणि त्यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले असे सांगत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी?? जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात! पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली, आणि त्यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले.
ही पार्टी ज्या रिसॉर्टमध्ये झाली, ते रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोप आहे! एकीकडे सामान्य नागरिकांवर लहानसहान कारणांसाठी कारवाई केली जाते, अनधिकृत बांधकामे तोडली जातात, तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनधिकृत रिसॉर्टवर मजा करत आहेत. महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे, याकडे लक्ष आहे का?