इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बेलिंडा रायगियर या ऑस्ट्रेलियन रियालिटी टीव्ही स्टारने नुकताच एक धक्कादायक खुलास केला आहे. शारीरिक संबंध ठेवण्याचे व्यसन लागल्याने चक्क ७०० पुरुषांसोबत झोपली असल्याचे तिने म्हणलं आहे. शिवाय, या गोष्टीचा कोणताही पश्चाताप नसल्याचेही तिने म्हणले आहे.
२०१७ मध्ये द बॅचलर ऑस्ट्रेलिया या शोचा एक भाग राहिलेली बेलिंडा रायगियरने स्वतःच्या खासगी आयुष्याबाबत अनेक बाबी समोर आणल्या आहेत. एक वेळी अशी होती जेव्हा तिच्या जीवनावर फक्त शारीरिक संबंधांनीत राज्य केले. यामुळे ती ७०० पुरुषांसोबत झोपली. आठवड्यामधील सात दिवसांमध्ये ती सहा दिवस रात्रीच्या वेळी शारीरिक संबंधांच्या शोधात बाहेर पडायची. गेल्या आठ वर्षांमध्ये तिच्या प्रकृतीमध्ये सुधार होत असून, १५ महिन्यांपासून तिने कोणासोबतही संबंध ठेवले नसल्याचे उघड केले आहे. You’re a Grub Mate! नावाच्या रेडिओ शोमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ही एक समस्या आहे हे मला माहित नव्हते. मात्र समजल्यानंतर बरे होण्याचे प्रयत्न तिने सुरु केले.
बेलिंडा म्हणाली, समस्यामुक्त झाल्यानंतर तिला जाणीव झाली की तिच्या जीवनामध्ये हा मोठा अपघात झाला आहे. सातशेपेक्षा जास्त पुरुषांसोबत झोपणे हे तिला अपघातासमान वाटते आहे. इथून पुढे मात्र शारीरिक संबंध ठेवताना पुरुषासोबत भावनिक कनेक्शन तयार होण्याची वाट बघणार असल्याचे ती म्हणाली. बेलिंडा रायगियर आता स्वतःला लव गुरु म्हणवते. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रीय आहे. तिथे तिला ९८०० पेक्षा जास्त लोक तिला फॉलो करतात.
TV Star Says Sex with 700 Men
Australian Belinda Luv Raigear