विशेष प्रतिनिधी, मुंबई
तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध मालिकेत आपल्या वेगळ्या लकबीत संवादफेक करणारी दया ही व्यक्तीरेखा तीन वर्षांनी पुन्हा पाहायला मिळणार आहे. पण दिशा वाकाणी ही भूमिका करणार नाहीय. पण एका प्रसिद्ध अभिनेत्रीला ही भूमिका ऑफर करण्यात आलेली आहे.
सोनी सब वाहिनीवरील तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील सगळीच पात्रे गाजलेली आहेत. पण त्यातल्या त्यात दिशा वाकाणी यांनी केलेली दयाबेन आणि दिलीप जोशी यांनी साकरलेली जेठालाल ही व्यक्तीरेखा चांगलीच गाजली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दयाबेन या मालिकेपासून लांब आहे. त्यामुळे प्रेक्षक दयाबेनची व्यक्तीरेखा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिला दयाची भूमिका ऑफर करण्यात आलेली आहे. दिव्यांकाने एका वाहिनीला मुलाखत देताना ही माहिती दिली आहे. या भूमिकेबाबत विचारणा झाली आहे. परंतु आधी मी त्याला नकार दिला. आता भूमिकेबाबत विचार करत आहे, असे तिने सांगितले.
२००८ पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या मालिकेत प्रेक्षकांना जेठालाल, दयाबेन, माधवी भिडे, आत्माराम भिडे, अय्यर, बबिता, कोमल या व्यक्तीरेखा चांगल्याच गाजलेल्या आहेत. विनोदी मालिकांमध्ये इतके वर्ष चाललेली ही पहिलीच मालिका आहे.