मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – छोटा पडदा म्हणजेच टीव्हीच्या केबल वाहिन्यांवर अनेक मालिका येतात आणि जातात, परंतु काही मालिका या रसिक प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहतात याला कारण म्हणजे या मालिकेमध्ये काम करणारे कलाकार होय. त्यापैकीच एक मराठी मालिका चांगलीच गाजली होती ती म्हणजे झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ होय. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे म्हणजे राणादा म्हणजे हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजे अक्षया देवधर यांनी मालिकेत चांगलाच रंग भरला होता. त्या मालिकेत जशी प्रेम काहणी रंगत गेली तशीच या दोन कलाकारांच्या प्रत्यक्ष जिवनातही प्रेम फुलत गेले.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांचा ठाण्यात ३ मे रोजी साखरपुडा पार पडला. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. परंतु त्याआधी दोघांनीही आपल्या नात्याची कुणाला कल्पना येऊ दिली नव्हती. अचानक त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता रसिक चाहत्यांना या जोडप्याच्या लग्नाची प्रतीक्षा आहे, ते कधी लग्नबेडीच्या अडकणार? त्यांचा लग्नसोहळा कुठे होणार? असे अनेक प्रश्न रसिकांच्या मनात आहे.
https://www.instagram.com/reel/CdGki8WJ3KT/?igshid=YmMyMTA2M2Y=
हार्दिक व अक्षया यांनी अलीकडे ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघांनीही मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी लग्न कुठे होणार? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिले आहे. तर त्यांचे लग्न पुण्यात होणार आहे. राणादा म्हणाला की, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे मी आणि अक्षया आम्ही दोघं भेटलो. या मालिकेमुळेच आम्ही घराघरात पोहोचलो. या मालिकेला कोल्हापुराची पार्श्वभूमी होती. तिथेच सगळं घडलं. म्हणून मालिकेच्या आठवणी जपण्यासाठी आम्ही खास कोल्हापूरवरून साखरपुड्याचे कपडे मागवले होते.
लग्नासाठी आम्ही पुण्याची निवड केली कारण आम्ही याबद्दल विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळी यांच्याशी बोललो आहोत. त्या दोघांना पुण्यातील अनेक विवाहस्थळे माहित आहेत. सध्या ठिकाणाचा शोध सुरू आहे. पण आम्ही पुण्यातच लग्न करणार आहोत, असेही राणादा म्हणजेच हार्दिक म्हणाला.
https://www.instagram.com/reel/CdLRd3oJZsK/?igshid=YmMyMTA2M2Y=
हार्दिक आणखी म्हणाला, ‘अक्षया माझी पत्नी होणार आहे. पण त्याआधी ती माझी सगळ्यात जवळची व चांगली मैत्रीण आहे. मला तिचा स्वभाव माहित आहे. ती कधी, कुठे कशी रिअॅक्ट होईल, हे मला आधीच कळते. पण ती फार पटकन रागावते आणि रागाच्या भरात नको ते बोलते,वागते. लग्नानंतर तिची ही सवय तिने बदलावी असं मला वाटते असेही हार्दिक यांने स्पष्ट केले.
tv serial fame hardik joshi akshaya devdhar wedding