मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आता टीव्ही मालिकांपेक्षा रिअॅलिटी शोबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा आहे. प्रत्येक चॅनलवर एक शो संपला की दुसऱ्याची तयारी सुरू होते. नुकताच ‘लॉकअप’चा पहिला सीझन यशस्वीरित्या संपला. यावेळी ‘खतरों के खिलाडी 12’ची सर्वाधिक चर्चा आहे. त्यानंतर ‘बिग बॉस 16’ही सुरू होणार आहे. स्पर्धकांच्या फीबाबत नेहमीच गप्पागोष्टी होत असतात, त्यामुळे आज आपण रिअॅलिटी शोच्या महागड्या स्पर्धकांबद्दल जाणून घेणार आहोत…
दिव्यांका त्रिपाठी रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये सहभागी झाली होती. ती सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये होती. रिपोर्टनुसार, दिव्यांकाने प्रत्येक आठवड्यासाठी 10 लाख रुपये घेतले होते.
राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये दिसला होता. त्याने प्रत्येक आठवड्यासाठी 15 लाख रुपये घेतल्याचे वृत्त होते.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई ‘बिग बॉस 13’ मध्ये दिसली होती. बातमीनुसार, ती त्या सीझनची सर्वात महागडी स्पर्धक होती. रश्मीने संपूर्ण सीझनसाठी सुमारे 1.20 कोटी फी घेतली.
रिमी सेन चित्रपटांपासून दूर आहे. ती ‘बिग बॉस 9’ मध्ये दिसली होती. या शोसाठी तिला 2 ते 2.5 कोटी रुपये मिळाल्याचे स्वतः रिमीने सांगितले होते.
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस 13’ जिंकला. त्यांनी एका आठवड्यासाठी 9 लाख रुपये घेतले.
रुबिना दिलीकने ‘बिग बॉस’चा 14वा सीझन जिंकला. त्यांनी एका आठवड्यासाठी 5 लाख रुपये घेतल्याची माहिती आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहरा ‘बिग बॉस 10’ मध्ये सहभागी झाला होता. तो या शोचा सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रिटी होता. रिपोर्टनुसार करणला एक कोटी रुपये मिळाले.
‘बिग बॉस 15’ करण कुंद्रा जिंकला नसला तरी तो अधिक लोकप्रिय झाला आहे. रिपोर्टनुसार, त्याला या शोसाठी 1.2 कोटी रुपये मिळाले होते.
तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस 15’ ची ट्रॉफी उचलण्यात यशस्वी ठरली. तेजस्वीने ‘बिग बॉस’साठी 2.1कोटी फी घेतली होती.