इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भांडण, वाद, विवाद, प्रेम, आणि टास्क असा मनोरंजनाचा भरभरून धमाका असलेला ‘बिग बॉस’ हा रिऍलिटी शो आहे. २००६ मध्ये भारतात हिंदीमध्ये सुरु झालेला ‘बिग बॉस’ हा मूळ डच येथील ‘बिग ब्रदर’ची आवृत्ती आहे. भारतात हा शो सुरू झाल्यानंतर या शोने यशाची शिखरे गाठली. या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना भविष्यात चांगल्या संधी मिळाल्या. तरीही या शो मध्ये राहून दिवस काढणे सोपे नाही. हा शो म्हणजे मनोरंजनाचा एक धमाका पॅक आहे
. हा धमाका पॅक पुन्हा आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. आतापर्यंत हिंदी ‘बिग बॉस’ या शोची १५ पर्व झाली आहेत. तर ‘बिग बॉस १६’ चा प्रोमो प्रदर्शित झाला असून सलमान खानचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. यासोबतच ‘बिग बॉस १६’च्या घराची झलकही पाहायला मिळाली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांनी ‘बिग बॉस १६’ च्या थीमबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस १६’ च्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सलमान खानची एंट्री पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणतो, “१५ वर्षांपासून बिग बॉसने सर्वांचा खेळ पाहिला आहे. यावेळी बिग बॉस आपला खेळ दाखवणार आहेत. सकाळ होईल पण चंद्र आकाशात दिसेल. गुरुत्वाकर्षण हवेत उडेल आणि घोडा सरळ चालेल. सावलीही निघून जाईल, स्वतःचा खेळेल खेळ. कारण यावेळी बिग बॉस स्वतः खेळणार आहे.” या धमाकेदार संवादासह सलमान खानचा लूकही खूपच कमाल आहे.
https://twitter.com/ColorsTV/status/1568996798404136961?s=20&t=ZSAyIpVuXXZ6lXqMCqWcEw
या व्हिडिओमध्ये सलमान खानने दिलेल्या हिंटनंतर अतुल कपूर या शोमध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतुल कपूर बिग बॉसचा व्हॉइस आर्टिस्ट आहे. बिग बॉसचा आवाज असलेला अतुल कपूर हे एक प्रसिद्ध नाव बनले आहे. यावेळीही तो भाग घेऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
निर्मात्यांनी अद्याप ‘बिग बॉस १६’च्या प्रसारणाची तारीख जाहीर केलेली नाही. प्रोमोद्वारे, निर्मात्यांनी सांगितले आहे की ते लवकरच बिग बॉस १६ चे नवीन एपिसोड आणणार आहेत. तसेच या पर्वातील स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. पण फैजल शेख, उर्फी जावेद, विवियन डिसेना, शिविन नारंग, मुनाव्वर फारुकी ते पूनम पांडे यांची नावं या पर्वासाठी चर्चेत आहेत.
https://twitter.com/BBmasaIa/status/1570030498478448641?s=20&t=ZSAyIpVuXXZ6lXqMCqWcEw
TV Reality Show Big Boss 16 Big Changes
Colors TV Salman Khan Entertainment