इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवुड किंवा हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेत्याप्रमाणेच अभिनेत्री देखील आपल्या कामाचे तगडे मानधन घेतात, यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे, त्याप्रमाणेच छोट्या पडद्यावर म्हणजे टीव्ही वरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री देखील काही मागे नाहीत, त्यापैकी काही अभिनेत्री मानधनाचे प्रचंड रक्कम घेतात. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सुंदरी असून त्या आपल्या जबरदस्त अभिनयाने कोणत्याही शोमध्ये क्रेझ वाढवतात. अर्थात या सौंदर्यवतींमध्येही खूप स्पर्धा आहे. उत्कृष्ट कामगिरीपासून ते सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीपर्यंत, या सुंदरींना अनेक पॅरामीटर्सवर तोलले जाते. या सौंदर्यवतींमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आपली उपस्थिती नोंदवण्याची स्पर्धा त्यांच्यात लागली आहे. त्यापैकीच काही सुंदरींची एका एपिसोडसाठी निर्मात्यांकडून किती जास्त पैसे घेतात, ते जाणून घेऊ..
शिवांगी जोशी
सध्या शिवांगी जोशी कलर्स वाहिनीवरील शो बालिका वधू 2 मध्ये मुख्य भूमिकेत आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेदरम्यान शिवांगी जोशी एका एपिसोडसाठी 60 हजार रुपये मानधन घेत होती.
दृष्टी धामी
प्रत्येक पात्रात प्राण फुंकणारी अभिनेत्री दृष्टी धामी हिचे नाव या यादीत सामील झाले आहे. गीत हुई सबसे पराई, मधुबाला आणि सिलसिला बदलते रिश्तों का यांसारख्या शोमध्ये दिसलेली दृष्टी धामी 65 ते 70 हजार फी घेते.
सुरभी ज्योती
सुरभी ज्योतीने कुबूल है आणि नागिन या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सुरभी ज्योतीने गुल खानच्या इश्कबाज या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती. सुरभी एका एपिसोडसाठी 70 ते 75 हजार रुपये घेते.
निया शर्मा
आयुष्यात मागे वळून न पाहिलेल्या निया शर्माने एक हजार में मेरी बहना है आणि जमाई राजा सारखे सुपरहिट शो केले आहेत. याशिवाय ती अनेक रिअॅलिटी शोचा भागही राहिली आहे. निया शर्मा एका एपिसोडसाठी 80 हजार रुपये घेते.
दिव्यांका त्रिपाठी
बानू मैं तेरी दुल्हन आणि ये है मोहब्बतें मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या दिव्यांका त्रिपाठीच्या चाहत्यांची कमी नाही. तिने खतरों के खिलाडीमध्ये चांगल्या खेळाडूंना हरवून अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास पार केला. दिव्यांका त्रिपाठी एका एपिसोडसाठी 80 ते 85 हजार रुपये घेते.
जेनिफर विंगेट
जेनिफर विंगेटने आपल्या अभिनय कारकिर्दीला लहानपणापासून सुरुवात केली होती. तिचा अभिनय पाहून जेनिफर टीव्ही इंडस्ट्रीची आवडती अभिनेत्री बनली आणि आज ती एका एपिसोडसाठी सुमारे 1 लाख रुपये फी घेते.
साक्षी तन्वर
‘कहानी घर घर की, तसेच ‘बडे अच्छे लगते हैं’ यामुळे साक्षी तन्वरने रसिकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. साक्षीची गणना टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्रींमध्येही केली जाते. साक्षी एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये घेते.
हिना खान
ये रिश्ता क्या कहलाता है, नागिन आणि बिग बॉस सारख्या शोचा भाग राहिलेल्या हिना खानला निर्माते जास्त पैसे देतात. हिना खान एका एपिसोडसाठी दीड ते दोन लाख रुपये घेते.
रुपाली गांगुली
अनुपमामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या रुपाली गांगुलीने सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्रीच्या यादीत स्थान मिळवले आहे. रुपाली या मालिकेच्या एका एपिसोडसाठी सुमारे 3 लाख रुपये घेत आहे. आता ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.