इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून घराघरात जाऊन पोहचलेली अर्चना म्हणजेच अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम चर्चेचा भाग ठरली आहे. सुरुवातीला ‘पवित्र रिश्ता’मधून साकारलेला उत्तम अभिनय तर त्यानंतर सुशांत राजपूत सोबतच्या रिलेशनशिपवरून तर त्यानंतर त्यातून ब्रेकअप करून विकी जैन सोबत लग्न केल्यामुळे ती सतत चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा अंकिता चर्चेत आली आहे. यावेळी ती प्रचंड ट्रोल होत आहे. नेटकरी अंकितावर भडकले आहेत.
अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच अंकिताने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे जैन परंपरेनुसार पूजा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अंकिताचे कृत्य पाहून चाहते तिच्यावर संतापले आणि तिला ट्रोल करत आहेत.
२००६ मध्ये ‘झी सिने स्टार की खोज’मध्ये अंकिताने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. या कार्यक्रमाने इंडस्ट्रीला अनेक कलाकार मिळवून दिले, त्यापैकीच एक म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिताने हा शो जिंकला नाही. पण या कार्यक्रमातून सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यात अंकिता यशस्वी राहिली. अंकिताकडे ‘पवित्र रिश्ता’च्या माध्यमातून मोठी संधी चालून आली. अंकिताने या संधीचं सोनं केलं आणि अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे घराघरात ओळखली जाऊ लागली.
२००९ – २०१४ पर्यंत अंकिता ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम करत होती. याच दरम्यान अंकिता ‘झलक दिखला जा’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘एक थी नायिका’मध्ये झळकली. अनेक चित्रपटात देखील तिने काम केले आहे. अंकिताने नुकताच एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती रितीरिवाजानुसार पूजा करताना दिसत आहे. मात्र, व्हिडीओमध्ये अंकिताचे काही कृत्य पाहून चाहते तिच्यावर संतापले आणि तिला ट्रोल करत आहेत. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अंकिता लाल रंगाच्या साडीत पारंपारिक पोशाखात दिसत आहे. तिचा पती विकी जैननेही पारंपारिक पोशाख परिधान केलेला दिसत आहे.
पूजेच्या वेळी अभिनेत्रीच्या काही कृती सोशल मीडिया युझर्सच्या पसंतीस उतरल्या नाहीत आणि युझर्सनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती अनेक ठिकाणी पूजेदरम्यान कॅमेरासमोर पोज देतानाही दिसत आहे. लोकांना अभिनेत्रीचा हा अंदाज आवडलेला नाही आणि त्यांनी कमेंट करून तिला ट्रोल केले. एका युजरने कमेंट करताना लिहिलं “पूजेमध्येही डान्स सुरू आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “देवाचा आदर करा, इथेही एक नाटकं सुरू आहेत.” आणखी एका युजरने लिहिलं, “सर्वकाही रेकॉर्ड करणं आवश्यक आहे का?” याशिवाय “पूजा पाठातही अभिनय करतेय” अशी प्रतिक्रिया एकाने केली आहे.
अनेक युजर्स अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकेकीकडे अंकिताला ट्रोल केलं जात असलं तरी अनेक चाहते अभिनेत्री आणि तिच्या पतीची प्रशंसा करताना दिसत आहेत. काहीजण असे आहेत ज्यांना तिचे हे धार्मिक रूप आवडले आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले, “देवा आशीर्वाद द्या.” दरम्यान या व्हिडीओमध्ये लाल साडी आणि मॅचिंग ज्वेलरीमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. तर तिचा पती विकी जैननेही धोतर परिधान केलेलं दिसत आहे.
TV Actress Ankita Lokhande Video Troll Users
Entertainment Social Media