इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीव्ही इंडस्ट्रीतून अत्यंत दु:खद बातमी आली आहे. मालिका कुसुम फेम अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे निधन झाले. सिद्धांत फक्त ४६ वर्षांचा होता. असे सांगितले जात आहे की तो जिममध्ये वर्कआउट करत असताना तो अचानक कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांना कळवण्यात आले असून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अलीकडच्या काळात एखाद्या अभिनेत्याचे अचानक निधन झाल्याची ही तिसरी दुःखद बातमी होती. यापूर्वी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. दुसरीकडे दीपेश भान क्रिकेट खेळत असताना अचानक खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
अभिनेता जय भानुशालीने त्याच्या इंस्टाग्रामवर सिद्धांतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याने सिद्धांतचा फोटो शेअर करत लिहिले, खूप लवकर गेले. जयला त्याच्या कॉमन फ्रेंडद्वारे कळले की तो जिममध्ये बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
कुसुमपासून करिअरची सुरुवात झाली
सिद्धांतने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यांना आनंद सूर्यवंशी या नावानेही ओळखले जाते. कुसुम या मालिकेतून सिद्धांतने टीव्हीवर पदार्पण केले. याशिवाय त्याने अनेक टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. कसौटी जिंदगी की, कृष्णा अर्जुन, क्या दिल में है या प्रमुख मालिका सिद्धांतच्या आहेत. तो शेवटचा क्यूँ रिश्तों में कट्टी बत्ती आणि जिद्दी दिलमध्ये दिसला होता.
सिद्धांतच्या पश्चात पत्नी अलेसिया राऊत आणि दोन मुले आहेत. त्याची पत्नी अॅलेसिया ही सुपर मॉडेल आहे. दोघांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. हे त्यांचे दुसरे लग्न होते. २०१५ मध्ये त्याने इराशी पहिले लग्न केले. सिद्धांत आणि इरा यांना एक मुलगी आहे. दुसरीकडे, अलेसियाला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे.
TV Actor Siddhaanth Vir Suryavanshi Death Gym Workout
Heart Attack Entertainment