बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आपण हळद का वापरतो? तिचे गुणधर्म काय आहेत? सरसकट वापरावी की…? घ्या जाणून सविस्तर…

by Gautam Sancheti
एप्रिल 26, 2023 | 9:43 pm
in इतर
0
turmeric

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– स्वयंपाकघरातील वनस्पती –
गुणकारी हळद

आपल्या घरातील किचनमध्ये हळद ही असतेच. प्रत्येक भाजी किंवा फोडणीमध्ये ती वापरतात. तिचे गुणधर्म काय आहेत, आयुर्वेदात तिचे महत्त्व काय सांगितले हे आज आपण जाणून घेऊया…

Dr Nilima Rajguru
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य
मो. 9422761801.
ई मेल – [email protected]

आपण भारतीय लोक हळदीचा मुक्तहस्ते वापर करतो. औषधात, स्वयंपाकात, देवपूजेत, शुभकार्यात, सौंदर्य प्रसाधनात अशा अनेक ठिकाणी हळद वापरली जाते. एवढेच काय पूर्वी नवजात बालकाला ठेवण्यासाठी पण काही ठिकाणी हळदीचा लेप लावलेली टोपली वापरली जात असे.कारण नवजात बालक अतिशय नाजूक असते आणि हळद ही जंतुसंसर्ग होऊ देत नाही. तसेच त्याची नाळ बांधायला पण हळदीचा लेप लावलेला धागा वापरला जात असे. हळद हा झाडाचा कंद आहे. झाडाची पूर्ण वाढ झाल्यावर हा कंद काढून त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून हळद करतात.

हळदीचे औषधी उपयोग :-
१) बाह्य म्हणजे बाहेरून उपयोग
२) आभ्यंतर म्हणजे आतून पोटातून घेऊन उपयोग
१) बाह्य उपयोग :-
अ} लेप करणे —– हळकुंड पाण्यात किंवा दूधात उगाळून, हळद चूर्ण (पावडर) पाण्यात किंवा दूधात कालवून किंवा शिजवून त्याचा कोमट करून लेप तयार करतात. सूज येणे, गाठ, पींपल येणे यांवर हा लेप घालतात.
खूप सर्दी झाल्यावर हा लेप त्यात थोडे सैंधव टाकून गरम करून छाती, पाठ, नाक, कपाळ यांवर घालतात.यामुळे कफ सुटतो.
ठेच, मुकामार लागल्यावर, रक्त साकळल्यावरपण हा गरम लेप तेलातून घालतात.

ब} अवचूर्णन—— म्हणजे हळदीची कोरडी पावडर टाकणे.कापले, रक्तस्राव झाला तर त्या जखमेवर कोरडी हळदीची पावडर टाकतात.त्यामुळे रक्तस्राव थांबतो आणि जंतुसंसर्ग होत नाही. उटण्यातही हळद वापरतात.
क} धुरी देणे——यालाच धूपन म्हणतात.छोटी लोखंडी कढई लाल तापवून त्यात कोरडी हळद टाकतात.त्यामुळे निघणाऱ्या धुरावर बाळाचे, आईचे कपडे धरून त्यांना धुरी देतात.यामुळे कपडे निर्जंतुक होतात.
घसा दुखणे, खवखवणे यात पण कढईत असाच धुर करून,कागदी नळकांडे करून ते धुरावर धरून घसा शेकतात.याने ऊचकीपण कमी होते. विंचवाच्या दंशावरपण ही धुरी देतात.त्यामुळे वेदना कमी होतात.मूळव्याधीची वेदनापण कमी होते.

२)आभ्यंतर म्हणजे पोटातून हळद घेणे.
हळदीचे दूध
——
आपल्याकडे परंपरागत सुप्रसिध्द असलेले हळदीचे दूध जे आता करोना काळात सरकारने पण गोल्डन मिल्क म्हणून जाहिर केले आहे. सर्दी ,खोकला , घसा दुखी यांवर हे रामबाण औषध आहे. दूध ,आले, हळद ,गुळ एकत्र करून उकळायचे आणि गरम गरम ते प्यायचे.हेच आपले दूध आता टरमेरिक लाटे म्हणून ग्लोबल झाले आहे. या हळदाच्या दूधाला नाक मुरडणारी तरूण पीढीपण मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कॅाफी शॅापमध्ये जाऊन त्याचा आस्वाद घेत आहे.

– खोकल्यात हळकुंड दिव्यावर भाजून त्याची पूड करून ती मधातून चाटवावी.
– हळद पचनाला मदत करते.अन्नाची चव , भूक वाढवते .म्हणूनच आपण भारतीय लोक रोज स्वयंपाकात हळद वापरतोच.
– पोटफुगणे,काविळ,जलोदर या रोगांत हळद गुणकारी आहे. काविळीचे नांव या यादीत बघून चमकलात ना! काविळीत हळद चालत नाही हा एक गैरसमज आहे. उलट काविळीत हळदीसारखे उत्तम औषध नाही.

– कृमीनाशन हा पण हळदीचा महत्वाचा गुण आहे.
– मूळव्याध, परिकर्तीका यात पण हळद व कोरफड गर एकत्र करून लावावा. हळदीचे तूप पण लावले तर चालते.
– मधुमेह, मूत्रविकार यात हळद व आवळा चूर्ण सकाळी अनशा पोटी घ्यावे.
– बाळंतीणीला पण रोज हळद द्यावी .
– डोळ्यांच्या विकारात हळद उपयोगी पडते. डोळे आल्यावर किंवा डोळ्यांना चिकट घाण येत असेल तर पाव चमचा हळद,१/२ चमचा त्रिफळा, १ चमचा जेष्ठमध एकत्र करून ४कप पाणी टाकून काढा करावा. म्हणजे १ कप उरेपर्यंत आटवावे. गाळून घेऊन थोडा वेळ ठेवावे. नंतर वरचे पाणी आय वॅाशींग कपात किंवा बशीत घेऊन डोळे धुवावे.
हा काढा तुम्हाला मल्टिपर्पज म्हणून वापरता येतो. घसा दुखणे, खवखवणे असेल तर यात किंचीत सैंधव टाकून याच्या गुळण्या करता येतात.तोंड आल्यावर हा काढा थोडावेळ तोंडात धरून ठेवावा,नंतर तो बाहेर टाकून तोंडाला आतून पाव चमचा हळद १ चमचा तूप व १ चमचा मध हे एकत्र करून लावावे. (मात्र, हे सर्व करताना आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे)
लक्षात ठेवा हळद गुणाने उष्ण आहे. त्यामुळे जपूनच वापरावी.

हळदीच्या काही पाककृती———
१) हरिद्राखंडपाक (हळदीच्या वड्या).
साहित्य—-
५० ग्रॅम हळद पावडर किंवा ओली हळद १०० ग्रॅम ,साजूक तूप ५० ग्रम , १छोटा नारळ, अर्धा लिटर दूध, २५० ग्रॅम खडीसाखर, सुंठ,मिरे , पिंपळी,दालचिनी , वेलची, तमालपत्र , नागकेशर पावडर प्रत्येकी १ग्रॅम
कृती:-
ओली हळद किसून घ्यावी. नसेल तर हळद पावडर घ्यावी. तूपावर ती परतून घ्यावी.त्यात दूध , खडीसाखर ,नारळ टाकावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. गोळा फिरायला लागला कि त्यात सुंठ,मिरे इ. घालावे. तूप लावलेल्या ताटात पसरवून ठेवावे. गार झाल्यावर छोट्या छोट्या वड्या पाडाव्यात.
उपयोग:-
पित्त कमी करते, अंगावर गांधी ,खाज, पुरळ येत असेल तर त्यात उपयोगी. प्रतिकार शक्ती वाढवते. वारंवार सर्दी होत असेल तर २१ दिवस सकाळी अनशा पोटी ध्यावे.

२) हरिद्राघृत (हळदीचे तूप)
साहित्य
हळद-५० ग्रॅम, साजूक तूप -२०० ग्रॅम,पाणी -१०० मिलि. दूध-८०० मिलि.
कृती:-
हळद पाण्यात कालवून वाटून घ्यावी. नंतर त्यात तूप व दूध घालावे आणि तूप शिल्लक राहिपर्यंत उकळावे. तूप कढवतो तशीच कृती करावी. शेवटी छान पिवळे तूप मिळते,ते कोरड्या बाटलीत भरून ठेवावे.
उपयोग:—
कापले,भाजले किंवा कुठलीही जखम असेल तर त्यावर लावता येते.मूळव्याध, परिकर्तीका (फिशर) यावर पण लावावे. लहान मुलांच्या नॅपीरॅश वर पण उपयोगी.पित्त होणे, जळजळ होणे यावर पोटातून कोमट पाण्यात घ्यावे. मूत्रप्रवृत्तीला आग होत असेल, तिडीक लागत असेल तर जेवणा आधी १ चमचा व जेवणानंतर १ चमचा हे तूप घ्यावे.

३) ओल्या हळदीचे लोणचे :-
साहित्य :-
ओली हळद २५० ग्रॅम, आले ५० ग्रॅम, लिंबूरस – अर्धी वाटी, सैंधव ६ चमचे. बडीशोप , धने, जिरे, हिंग १/२ चमचा प्रत्येकी. १चमचा मोहरी दाळ, १/४ चमचा ओवा.
कृती:-
हळद स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. ती किसून घ्यावी. धूपवलेल्या काचेच्या बरणीत तळाला आधी थोडे सैंधव टाकावे.त्यावर हळदीचा थोडा किस टाकावा. परत थोडे सैंधव,त्यावर किस ,असे थर करावे . त्यावर लिंबूरस घालावा. हे मिश्रण रोज हलवावे. ८ दिवसांत ते मुरते.नंतर त्यात वरील मसाला किंचीत भाजून भरड करून टाकावा. हवी असल्यास तेलाची फोडणी गार करून घालावी.
उपयोग :-
उत्तम पाचक , भूक वाढवणारे

थोडी विशेष माहिती :-
आधुनिक हळदी घाटाची लढाई ! १९९७ साली अमेरिकेत हळदीचे पेटंट दिले गेले होते. त्यावेळी भारताने माननीय रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर लढा दिला. भारतात हजारो वर्षींपासून हळदीचा औषधी , जंतुघ्न, रक्तस्राव थांबवणेसाठी,तसेच स्वयंपाकात उपयोग केला जातो ,हे विविध ग्रंथातील संदर्भ देऊन सप्रमाण सिद्ध केले आणि अखेरीस ते पेटंट रद्द करवूनच घेतले.

डॅा. नीलिमा राजगुरू
एम डी आयुर्वेद, नाशिक
९४२२७६१८०१
ईमेल: [email protected]
Turmeric Use in Food Items Importance by Neelima Rajguru

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अश्वमेधनगरमध्ये महिलेच्या घरात घुसून तोडफोड

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – काका आणि काकू

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - काका आणि काकू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011