इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुर्कस्तान आणि शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नूरदगीपासून २३ किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.८ इतकी मोजली गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये किमान २३०० लोकांचा मृत्यू झाला असून ५००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. १० शहरांमधील १७०० हून अधिक इमारतींचे नुकसान झाले, असे अहवालात देशाचे उपाध्यक्ष फियाट ओकटे यांचा हवाला देत म्हटले आहे. त्याच वेळी, सीरियामध्ये किमान ७८३ लोक मारले गेले आणि ६३९ जखमी झाले. इस्रायल आणि लेबनॉनमध्येही अनेक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.
https://twitter.com/ismailrojbayani/status/1622437890247598083?s=20&t=9KIAJkhWtzOX4ZjVGRWO2w
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू गॅझियानटेपपासून सुमारे ३३ किलोमीटर (२० मैल) आणि नूरदगी शहरापासून सुमारे २६ किलोमीटर (१६ मैल) अंतरावर होता. हे १८ किलोमीटर (११ मैल) खोलीवर केंद्रित होते. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
https://twitter.com/EduMPunjab/status/1622459416556486656?s=20&t=9KIAJkhWtzOX4ZjVGRWO2w
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी ट्विटरवर सांगितले की, भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव पथके तातडीने पाठवण्यात आली आहेत. आम्हाला आशा आहे की आम्ही एकत्रितपणे या आपत्तीवर लवकरात लवकर आणि कमीत कमी नुकसानासह मात करू.
https://twitter.com/Naveedawan78/status/1622461672408449024?s=20&t=9KIAJkhWtzOX4ZjVGRWO2w
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपाच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे जीवित व मालमत्तेची हानी झाल्याने दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमी लवकर बरे होवोत. भारत तुर्कस्तानच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
https://twitter.com/UZAIR_SHAHID/status/1622478202315718656?s=20&t=9KIAJkhWtzOX4ZjVGRWO2w
Turkey Earthquake Hundreds of Killed 4 Countries
Natural Calamities Disaster