इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली आहे. युरोपीय भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने (ईएमएससी) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १.२ मैल अर्थात जवळपास दोन किलोमीटर खोल आहे. सोमवारी टर्की आणि सीरीया देशाचा सीमाभाग ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेने हादरला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ ठार आणि ३०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दोन आठवड्यांपूर्वी याच प्रदेशात विनाशकारी आणि प्राणघातक भूकंपाची घटना घडली होती. टर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत ४६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देशामध्ये अद्याप बचावकार्य सुरू आहे. हे बचाव कार्य सुरू असताना याच भागात भूंकपाचे हादरले बसले आहेत. यामुळे स्थानिक लोक भयभीत झाले आहेत.
देश पुन्हा उभा राहतोय
टर्की येथे झालेल्या भूकंपाने हजारो नागरिकांचा बळी घेतला आहे. भूकंपाने प्रचंड नुकसान झाले आहे. इतर देशांकडून मदत मिळवत टर्की आणि सीरिया हे देश पुन्हा उभा राहत आहे. अनेक नागरिक बेघर झाल्याने त्यांना निवारा म्हणून लवकरच तेथे सरकार कडून घरे बांधून दिली जाणार आहे. साधारणपणे दोन लाख घरे बांधली जणार असल्याची माहिती टर्कीचे राष्ट्रपती रेसेप तईप यांनी दिली होती.
इतर देश आली मदतीला
टर्की आणि सिरिया येथे पहिला भूकंप हा ६ फेब्रुवारीला झाला होता. त्यावेळी हजारो नागरिकांचा त्यामध्ये बळी गेला होता. यामध्ये भारताच्या एनडीआरएफ पाठवत मदत केली आहे. इतर देशही मदतीला धावले आहेत. भूकंपामुळे मोठे संकट दोन्ही देशासमोर उभे राहिले आहे. त्यामध्ये आता पुन्हा शहर उभे करण्यासाठी टर्की आणि सीरिया या दोन्ही देशाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
Watch: The latest #earthquake that struck #Turkey and #Syria killed at least six people and injured more than 340 in both countries.https://t.co/GR1En4ZsA1 pic.twitter.com/pSiTnQZISQ
— Al Arabiya English (@AlArabiya_Eng) February 21, 2023
Turkey Earthquake Again 6.4 Magnitude