इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात विजेची कमतरता ही केवळ आपल्या देशातील समस्या नसून जगभरातील समस्या बनली आहे. विजेसाठी लागणारा कच्चामाल कालांतराने संपणार असल्याने ऊर्जेचे अन्य स्रोत शोधण्यासाठी जगभरात नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. त्यातच आता आणखी एका नवीन प्रयोगाची त्यात भर पडली आहे. इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीने एक नवीन आणि अनोखा प्रयोग केला आहे, ज्याद्वारे अक्षय ऊर्जा निर्माण करता येते.
सदर तंत्रज्ञान हे पवन चक्क्यासारखे काम करते. पण, त्याची संकल्पना वेगळी आहे. यात वेगाने जाणाऱ्या वाहनांमधून बाहेर पडणारा वारा टर्बाइनला चालवतो आणि त्यातून वीज निर्माण करतो. या नवीन तंत्रज्ञानावर आधारित टर्बाइनचा शोध तुर्कीच्या Devici टेक या कंपनीने लावला आहे. सध्या त्याची चाचणी तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये सुरू आहे. ही टर्बाइन २४ तासात १ किलोवॅट वीज निर्माण करण्यास सक्षम आहे.
https://twitter.com/ErikSolheim/status/1511593546536562691?s=20&t=9xtxT0UfrY6H-uy9ejw39w
इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यातून अक्षय ऊर्जा स्त्रोत प्राप्त केला जात आहे. त्याची संकल्पना ट्रॅफिकमधून जाणाऱ्या वाहनांवर आधारित आहे. आता एक उदाहरण देऊन समजावून घेऊ या, कधीतरी एक वेगवान कार आपल्या बाजूने गेली तर वाऱ्याचा जोरदार सोसावा जाणवतो? होय, हे तंत्र असेच कार्य करते. जोरदार वारा ऊर्जा निर्माण करतो. वेगवान वाहनांचा वारा टर्बाइन चालवतो आणि ऊर्जा निर्माण करतो. कोणाहीला हे जाणून आश्चर्य वाटेल की 1 तासात ही टर्बाइन 1 किलोवॅट ऊर्जा निर्माण करते.
विशेष म्हणजे महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केल्यावर ही घटना चर्चेत आली आहे त्याच वेळी, त्यांनी लिहिले की इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर करून, भारत पवन ऊर्जेमध्ये जागतिक शक्ती बनू शकतो, कारण भारतातील वाहतूक लक्षणीयरीत्या विस्तारली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आणि विचारले की आपण त्यांचा वापर आमच्या महामार्गांवर करू शकतो का? त्यानंतर हा प्रयोग ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.