मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; १६ वर्षात २० वेळा बदलीचे आदेश

by India Darpan
नोव्हेंबर 29, 2022 | 9:05 pm
in संमिश्र वार्ता
0
tukaram mundhe

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे. कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही. त्यामुळे अधिकारी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

तुकाराम मुंढे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाचे आहे. आपल्या शिस्तबद्द स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसेच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचे नाव प्रसारमाध्यमांमध्येही नेहमी असते. आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा विक्रम झाला आहे. आतापर्यंत गेल्या १६ वर्षात तुकाराम मुंढेंच्या तब्बल २० पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागात बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आत मुंढे यांचा कार्यभार काढला. अद्याप नव्या जागेवर पोस्टींग नाही.

काही अधिकारी असे आहेत की, ते नेहमी जनतेच्या सोयी सुविधांसाठी विकास कामासाठी दक्ष असतात. त्यामध्ये तुकाराम मुंडे यांचा समावेश होतो, असे म्हटले जाते. परंतु ते नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या अनेक वेळा अनेक ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. असे शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे हे मागील महिन्यात ऐन दिवाळी काळात मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, बीड जालना, लातूर, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भेटी दिल्याने कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्या झोपा उडाल्या होत्या.

राज्यातील विविध जिल्ह्यात आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे सन २००५ मधील आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या धडाकेबाज कामाची ओळख निर्माण केली आहे. मुंढे यांच्या कामाबद्दल नागरिकांत नेहमीच समाधान व्यक्त करण्यात येते. मात्र सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी त्यांचे काम हे अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येते. काही वेळा सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र येतात, त्यामुळे तुकाराम मुंढेंची बदली होते. परंतु नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केलेला नाही, सध्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या मुंडे यांनी येथे देखील आपली अशीच कार्यशैली दाखवली, आता त्यांची नेमकी कोणत्या विभागात आणि कोठे बदली होते, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.

Tukaram Mundhe Transfer Order 16 Year 20 Transfer

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे रुग्णालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था’ इमारत बांधकामास मंजुरी

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; बघा यादी

Next Post
mantralay 2

मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; बघा यादी

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011