बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे हे ऐन दिवाळी काळात मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, बीड जालना, लातूर, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भेटी देत असल्याने कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्या झोपा उडाल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळातच तुकाराम मुंढे मराठवाडा दौरा करत असल्याने आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची धास्ती वाढली आहे. आता तुकाराम मुंढे मराठवाडा दौऱ्या दरम्यान कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करत आहेत.
सनदी अधिकारी जनतेची कामे करत नाहीत, ते भ्रष्टाचारी असतात, असे म्हटले जाते. परंतु काही अधिकारी असे आहेत की, ते नेहमी जनतेच्या सोयी सुविधांसाठी विकास कामासाठी दक्ष असतात. त्यामध्ये तुकाराम मुंडे यांचा समावेश होतो, असे म्हटले जाते. परंतु ते नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या अनेक वेळा अनेक ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. सध्या तुकाराम मुंढे हे पुन्हा अॅक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत. मुंढे यांनी आयुक्त आरोग्य सेवा तसेच संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेतल्यानंतर कारवाईला सुरुवात केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.
आता खासगी प्रॅक्टिस केली तर थेट निलंबित करणार, असा दम देत मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. तसेच याबाबत मुंढे यांनी दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत तातडीने अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक लातूर यांना दिले आहेत. तसेच उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही, असा दमही मुंढे यांनी दिला आहे.
बीड जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभाग, प्रसूती वार्ड आणि फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते तर खाजगी डायग्नोसिस सेंटर मधून रिपोर्ट त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचे, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. खरे म्हणजे रुग्णालयात मुंढे यांची अचानक भेट दिल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली होती. यावेळी अनेक डॉक्टरांना व्यवस्थित उत्तर देखील देता आली नाहीत, त्यामुळे देखील मुंडे चांगलेच संतापले होते. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या आणि रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कडक शब्दात सूचना दिल्या आहे. तसेच वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन मुंडे यांनी रुग्णांची विचारपूसही केली.