इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पॅसिफिक महासागरातील टोंगा बेटावर भूमिगत ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर प्रचंड त्सुनामी आली आहे. त्यामुळे तब्बल दोन मीटरपर्यंत उसळणाऱ्या त्सुनामीच्या लाटांमुळे समुद्र किनाऱ्यावर हाहाकार उडाला आहे. किनाऱ्यावरील हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीत तब्बल एक लाखाहून अधिक नागिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरांसह मालमत्तांचो आतोनात नुकसान झाले असून जगभरातून या आपत्तीबाबत विशेष चिंता व्यक्त होत आहे.
टोंगा बेटा जवळलील ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आणि त्यात ज्वालामुखीचा वरचा मोठा भाग महासागरात कोसळला. त्यामुळे समुद्रात महाकाय त्सुनामी आली आहे. परिस्थिती झपाट्याने बदलल्याने टोंगा बेटावर हाहाकार उडाला आहे. त्सुनामीच्या लाटा आणि उद्ध्वस्त घरांचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नागरिकांनी सुरक्षित स्थळी पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने गतिमान बचावकार्य सुरू केले आहे. मात्र त्सुनामीचे रौद्र रुप आहे. व्हायरल होणार्या बहुतेक फुटेजमध्ये दक्षिण पॅसिफिक बेट दाखवले जात आहे. तेथील समुद्रकिनारी शेकडो घरे पडताना दिसत आहेत.
https://twitter.com/sakakimoana/status/1482218193619865600?s=20
शनिवारी सायंकाळपासून येथील फोन आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्सुनामीनंतर येथील जीवित व मालमत्तेबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्ड्रेन यांनी म्हटले आहे की, टोंगातील दळणवळण प्रणाली सुधारण्यासाठी देखील काम सुरू झाले आहे, परंतु आतापर्यंत ते केवळ मर्यादित कार्यक्षेत्रात केले गेले आहे. राजधानी नुकु अलोफामध्ये सध्या कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. टोंगा बेट 2383 किमी पसरले असून येथे 1 लाख 5 हजार नागरिक राहतात. सदर बेट हे न्यूझीलंडच्या ईशान्येला स्थित आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचा जाड थरही जमा झाल्याचे आर्ड्रेनचे म्हणणे आहे. आतापर्यंत येथून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
https://twitter.com/JTuisinu/status/1482243845614374915?s=20
ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक निश्चितपणे सॅटेलाइट इमेजेसवरून दिसून येत असून या छायाचित्रांमध्ये ज्वालामुखीतून निघणारा धूर स्पष्टपणे दिसत आहे. हा धूर सुमारे 12 मैल उंचीपर्यंत दिसत असून टोंगा बेटावर ज्वालामुखीच्या राखेचा थर देखील दिसतो. सध्या प्रत्येकाला तिथे राहणाऱ्या लोकांची काळजी आहे. माहिती न मिळणे आणि दळणवळण सेवा विस्कळीत झाल्याने लोकांची चिंता आणखी वाढली आहे. ऑकलंडसह इतर शहरांमध्ये टोंगामध्ये राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना केल्या जात आहेत.
https://twitter.com/ignis_fatum/status/1482322192029433857?s=20
टोंगामध्ये अनेक घरे, दुकाने आणि इतर गोष्टी उद्ध्वस्त झाल्या आहेत. न्यू कॅलेडोनियामध्ये झालेल्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पॅसिफिक बेट तातडीने रिकामे करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कारण सुनामीच्या लाटा तीन मीटरपेक्षा जास्त उंचीवर पोहोचू शकतात. पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्राने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे 1000 किलोमीटरच्या त्रिज्येत धोकादायक सुनामी लाटा येऊ शकतात. तसेच न्यू कॅलेडोनियामध्ये जोरदार भूकंप झाला आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.5 इतकी आहे.
https://twitter.com/_vejiga/status/1482218429121802240?s=20