नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): स्पोर्ट्स क्राफ्ट द्वारे नाशिक मध्ये दुचाकी व चारचाकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये चारचाकी वाहनांमध्ये शिल्पा भेंडे – मनोज जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून दुचाकी स्पर्धेमध्ये जयवंत बेंडकुळे – प्रशांत सातव यांनी विजय मिळवला आहे .
ही स्पर्धा टीएसडी (वेळ वेग अंतर) या मध्ये झाली असून सुमारे ७५ किलोमीटरची नेव्हिगेशन रॅली होती. या स्पर्धेमध्ये नॅव्हिगेशन करण्याचे कसब पणाला लागले होते. या स्पर्धेमध्ये एकूण पन्नास स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ३२ चारचाकी तर १८ दुचाकी गाड्यांचा समावेश होता. या स्पर्धेची सुरवात ९ मार्च २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता एसएसके वर्ल्ड क्लब, पाथर्डी, नाशिक, येथे एसएसके वर्ल्ड क्लबचे संचालक शैलेश कुटे, आर टी ओ अधिकारी अभास देसाई , सचिन बोधले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. तर पारितोषिक वितरण समारंभ आकाश अग्रवाल व यशश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरज कुटे , हर्षल कडभाने, अंकित गज्जर, समीर बुरकुले, अनिश नायर, कौस्तुभ मच्छे, शमीम खान ,युवराज यादव, भूपेंद्र सैनी,अमित बेलगावकर, अमित सूर्यवंशी यांच्यासह अनेक युवकांनी प्रयत्न केले .
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे .
चारचाकी
प्रथम : शिल्पा भेंडे – मनोज जोशी . द्वितीय : अश्विन पाटील – योगिता पाटील . तृतीय : हिरामण ढेरंगे – सागर सोनावणे
दुचाकी
प्रथम : जयवंत बेंडकुळे – प्रशांत सातव , द्वितीय : हितेन ठक्कर – संतोष सरकाळे . तृतीय : महेश ठक्कर – भावना ठक्कर
सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ संघ : अश्विन पंडित – श्रीरंग मच्छे
सर्वोत्कृष्ट महिला संघ : सेराफिने सुसाईनाथन – नम्रीथा लिमा
सर्वोत्कृष्ट तरुण संघ : तेजस साळुंखे – श्रेय बोरस्ते
सर्वोत्कृष्ट पती आणि पत्नी संघ : मुकेश भाटिया – शिल्पा भाटिया
विजेत्यांना रोख बक्षिसे , चांदीची नाणी प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले .