त्र्यंबकेश्वर – राज्य सरकारने धार्मिक स्थळे अद्यापही बंदच ठेवली आहेत. त्यातच श्रावण महिना लागल्याने त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी होऊ शकते यासाठी प्रशासनाने दर सोमवारी संचारबंदी लागू केली आहे. त्याचा त्र्यंबकवासियांना मोठा फटका बसत आहे. याबाबत शहरवासिय संतप्त झाले असून त्यांनी तहसलिदरांकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
कोरोना वैश्विक महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या १५ महिन्यांपासून प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या टाळेबंदी सह घालून दिलेल्या नियम पाळत, आर्थिक गणितं जुळवता जुळवता आयुष्याचा गाडा ओढताना आता अक्षरशः सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं आहे. आता कुठे या टाळेबंदी मधून मुक्त होत आशेचा चा किरण म्हणून श्रावण महिना दिसत असतानाच ऐन श्रावणाच्या मुख्य दिवस सोमवारी प्रशासनाने केलेल्या नाकेबंदी ने जणू चालू झालेला श्वासच थांबल्या ची अनुभूती मंदिर परिसरातील व्यापारी वर्गाला व स्थानिकांना येवू लागली आहे. पहिल्या श्रावण सोमवारच्या पुर्वसंध्येला अचानक त्र्यंबक नगरीत कलम १४४ लागू केले गेल्याने बाजारपेठेतील व्यापरींसह, स्थानिकांना वेठीस धरण्यात काय अर्थ आहे? असा प्रश्न नागरीकांनी प्रशासनाला विचारण्यात आला. नाकाबंदी करण्यापेक्षा आवश्यक ते नियोजनातून स्थानिकांची गैरसोय न होता आलेल्यांनाही समाधान मिळेल, व्यापार सुरळीत होवून अर्थकारणाला बळकटी मिळेल असे नियोजन करावयास हवे होते. मुलांच्या शाळेच्या फी, गेल्या वर्षभरात औषधोपचारावर झालेला खर्च, घरपट्टी, पाणीपट्टी सह विविध करांचा बोझा, दुकान भाडे, घर भाडे, बँकांचे थकीत हफ्ते यामुळे व्यापारी वर्ग व स्थानिकांचा सहनशीलतेचा अंत होत असल्याचे भुषण भुतडा यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांताधिकारी व पोलिस प्रशासना मार्फत
मंदिर चौकातील रस्ते बंद करत आहात ते निर्णय मागे घेउन स्थानिक नागरिकांसह व्यापारी वर्गाला दिलासा देण्यात यावा. त्याचबरोबर शासनाने इतर जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याचे पालन सर्व व्यापारी करत आले आहे व यापुढेही करतील यात दुमत नाही याचे आश्वासन ही देण्यात आले. येणारे जे काही श्रावण सोमवार सह मुख्य सण उत्सव आहेत त्यावेळी रस्ते बंद न करता योग्य ते नियोजन करावे जेणेकरून व्यापारी वर्गाला ही व्यापार करणे सुरळीत होईल, गर्दी होणार नाही व त्याच बरोबर स्थानिकांना ही वेठीस धरले जाणार नाही, अशा आशयाची मागणी करण्यात आली. यानंतर तहसीलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व पोलिस खात्यातील वरिष्ठ निरीक्षक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यातून मार्ग काढून पूर्ववत करण्याचे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले. यावेळी मंदिर चौक परिसरातील विविध समस्यांची चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव, तहसीलदार दिपक गिरासे, पोलिस निरीक्षक संदिप रणदिवे, नगरसेवक दिपक लोणारी, कैलास चोथे यांचेसह बाळासाहेब सावंत, भुषण भुतडा गणपत कोकणे, जॉनी अग्रवाल, आशिष दीक्षित, अवधूत वाघ, सागर मोरे, अमोल सूर्यवंशी, हर्षद मालपाणी, संजय कदम आदी उपस्थित होते. यावेळी ७० नागरीकांच्याच्या स्वाक्षरींचे निवेदन देण्यात आले .