नाशिक – गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेला ब्रह्मगिरी परिसर पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू झाला आहे. गोदावरी नदीचा उगम असलेल्या गंगाद्वार येथे काही दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. यास काही दिवस उलटत नाही तोच आता ब्रह्मगिरी मार्गावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत नाशिकरोड परिसरातील तीन जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ब्रह्मगिरी परिसर हा उत्खननामुळे सध्या चर्चेत आहे. उत्खननामुळेच येथे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे. सरकार आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे ब्रह्मगिरी परिसर धोक्यात आल्याचा आरोप त्र्यंबकवासियांनी केला आहे.
बघा व्हिडिओ