नाशिक – कोरोनाच्या संसर्गाने रुग्णांना मदतीची नितांत आवश्यकता निर्माण झाल्याने आता देवस्थानांनी मदत करावी असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त जयसिंग झपाटे यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग आता टिपेला पोहोचला असून त्यामुळे सर्वत्र मदतीची याचना होत आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक व सेवाभावी कार्य करणाऱ्या देवस्थानांना मदतीची साद घालण्यात आली आहे . धर्मदाय तसेच सेवाभावी काम करणाऱ्या संस्थांनी अशा काळात मदत करणे अपेक्षित असल्याने धर्मदाय आयुक्त यांनी आवाहन केले आहे .
गतवर्षीही जिल्ह्यातील देवस्थानांनी मदत केली होती . दरम्यानच्या काळात आलेली दुसरी लाट भयंकर असल्याने अशा काळात मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. देवस्थान तसेच विश्वस्तांनी मदत कायदेशीर मार्गाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करावी असे आवाहनही करण्यात आले आहे .
धर्मादाय आयुक्तालयाच्या नाशिक विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून नाशिक सह धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातील देवस्थानांना मदतीची विनंती करण्यात आली आहे. याबाबतचआवाहनही धर्मदाय आयुक्त यांनी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान आर्थिक स्वरूपातील मदत ही ऐच्छिक राहणार असून त्यासाठी कोणतीही सक्ती करू नये असेही स्पष्ट करण्यात आले.