मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांनी वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल GLOBAL FOUNDATION MAHARASHTRA कडून नाशिक जिल्ह्यातून उत्कृष्ट महिला वेटलिफ्टिंग प्रशिक्षकचा “भूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांनी सलग तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आणि ३ सुवर्ण, ९रौप्य व ५ कांस्य पदक मिळवून दिले. ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पि प ग्रीस युरोप येथे १ सुवर्ण,३ रौप्य व २ कांस्य युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप लिओन मेक्सिको येथे १ सुवर्ण,२ रौप्य व ३ कांस्य पदक मिळवून दिले युथ & ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप ताशकेंत उझबेकिस्तान येथे १ सुवर्ण व ४ रौप्य पदक मिळवून दिले. मनमाड सारख्या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याची शान वाढवणाऱ्या तृप्तीचे सर्वत्र अभिनंदन करून या भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.