मनमाड – भारतीय क्रीडा प्राधिकरण आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी जय भवानी व्यायाम शाळेची माजी खेळाडू व सध्या औरंगाबाद साई येथे प्रशिक्षक असलेली तृप्ती शेखर पाराशर हिची राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तिच्या या निवडीमुळे मनमाड शहरातील व नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्रातील पहिलीच प्रशिक्षक ठरली आहे.
राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी जय भवानी व्यायामशाळा व गुरू गोविंद सिंग हायस्कुलची विद्यार्थीनी आकांक्षा किशोर व्यवहारे हिची सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. यशस्वी खेळाडू प्रशिक्षक यांना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे, व तसेच निवड झालेले साई सेंटर (औरंगाबाद ) येथील पाच खेळाडू यांना NIS कोच तृप्ती पाराशर यांनी प्रशिक्षण दिले. हे खेळाडू पतियाळा येथे प्रशिक्षण शिबिरासाठी जाताना मनमाड येथे आले असतांना शिवसेना संपर्क कार्यालयात मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने त्या सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचा सत्कार करून त्यांच्या होणाऱ्या स्पर्धेसाठी विजयी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, जि.संघटक राजाभाऊ भाबड, जि. समन्वयक भाऊ पाटील,मुन्नाभाऊ दरगुडे, सुनिल हांडगे, योगेश , सचिन दरगुडे, छोटू राऊत, आशिष पराशर, दीपक मौर्य, ई. शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठोंबरे सर यांनी केले.