इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमधील एका व्यक्तीने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या पत्नीला जीवनाची भेट दिली. पाली येथील डॉ. सुरेश चौधरी यांनी त्यांची कोविडबाधित पत्नी अनिता हिला वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. शेवटी प्रेमाचा विजय झाला. त्याने आपल्या पत्नीला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. डॉ. चौधरी यांनी पत्नीच्या उपचारासाठी एमबीबीएसपर्यंतची पदवी गहाण ठेवली. उपचारासाठी दीड कोटी रुपये खर्च झाले. सुरेश चौधरी हे पाली जिल्ह्यातील खैरवा गावचे रहिवासी असून ते पत्नी अनिता आणि ५ वर्षांच्या मुलासोबत राहतात.
गेल्या वर्षी अनिताची प्रकृती कोरोना व्हायरसच्या काळात खालावली होती. त्यांना सतत खूप ताप येत होता. तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. काही दिवसातच त्यांची प्रकृती खराब होऊ लागली. डॉक्टर सुरेश पत्नीसह बांगर रुग्णालयात गेले, मात्र त्यांना बेड मिळाले नाही. त्यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर सुरेश त्यांना जोधपूर एम्समध्ये घेऊन गेला. तेथे पत्नीला दाखल केले. अनिताची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची फुफ्फुसे ९५ टक्के खराब झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. अनिताचे जगणे आता कठीण आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले होते. असे असूनही सुरेशने धीर सोडला नाही. तो सुनितासोबत अहमदाबादला गेला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या सगळ्या कोरोनाच्या आजारपणामुळे अनिताचे वजन खूप कमी झाले होते. त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता होती. यानंतर डॉक्टरांनी ईसीएमओ मशीनवर शिफ्ट केले. या मशीनची एका दिवसाची किंमत एक लाख रुपयांहून अधिक होती. उपचारामुळे सुरेशवर कर्ज वाढतच होते. अनित तब्बल ८७ दिवस रुग्णालयात होत्या. अखेर डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवले. सुरेशने पत्नीच्या उपचारासाठी एमबीबीएसची पदवी गहाण ठेवून बँकेकडून ७० लाखांचे कर्ज घेतले. याशिवाय मित्रांकडून २० लाख रुपये घेतले. त्याने त्याची एक जमीनही उपचारासाठी विकली. आता व्हॅलेंटाइन डेदरम्यानच अनिता घरी आली असून, पतीच्या प्रयत्नांना यश आल्याने सगळीकडेच त्याच्या कष्टाचं कौतुक केलं जात आहे.