इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वातंत्र्यदिनाच्या रात्री देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच दुसरीकडे त्रिपुरा पोलीस मुख्यालयातून अनेक अधिकृत फाईल्स चोरीला गेल्या. चोरी व्यतिरिक्त इतर अनेक फाईल्स देखील खराब झाल्या आहेत. त्यानंतर विरोधक त्रिपुरा पोलिस आणि राज्यातील भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहेत. पोलीस मुख्यालयातून फायली चोरीला गेल्याच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आणि माकपने केली आहे. विशेष म्हणजे ही घटना दि. 15 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयात घडली होती. त्रिपुराचे काँग्रेसचे आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विरोधी पक्षनेते माणिक सरकार यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस आणि नागरी प्रशासन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. चोरी झालेल्या फाईल्सच्या संख्येबाबत अनेक निवेदनांमध्ये पोलिसांनी किती जप्त केले आणि आरोपी कोण आहेत याची वेगवेगळी माहिती दिली. त्रिपुरा पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी चोरीबद्दलचे पहिले अधिकृत विधान जारी केले होते. त्यात म्हटले आहे की, दि. 15 ते 16 ऑगस्टच्या मध्यरात्री, पोलिस मुख्यालयाच्या केबिनमध्ये ठेवलेल्या काही निष्क्रिय फायली चोरट्यांनी चोरल्या नुकसान केल्या. मात्र, चोरीला गेलेल्या फाईल्स कशाशी संबंधित आहेत, हे स्पष्ट करण्यात आले नाही. चोरीच्या फाईल्सचा मोठा भाग घटनेच्या दिवशीच जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यामध्ये पश्चिम आगरतळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे, असे पोलिस निवेदनात म्हटले आहे. 18 ऑगस्टच्या संध्याकाळी, त्रिपुरा पोलिसांनी या घटनेबद्दल दुसरे प्रेस स्टेटमेंट जारी केले, प्राथमिक तपासानुसार ही घटना “अमली पदार्थांच्या व्यसनींनी” केली होती. पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी चोरीच्या सर्व फाईल्स जप्त केल्या. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
तथापि, सीपीएम आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे की फाईल्स चोरीला गेलेल्या नाहीत, तर आतल्यांच्या मदतीने पोलीस मुख्यालयातून काढण्यात आल्या आहेत. सरकार किंवा प्रशासनातील प्रभावशाली लोकांना संरक्षण देण्यासाठी हे केले गेले. राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांच्याकडे गृह खाते आहे. मुख्यालयातून 182 फाईल्स चोरीला गेल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. एकूण 165 फाईल्स चोरीला गेल्या असल्या तरी त्या जप्त करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पण 165 की 182? कोणते बरोबर आहे? या संपूर्ण प्रकरणावर शंका घेण्यात येत आहे.
Tripura Police Headquarter 182 Files Missing Crime