इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काय निकाल लागणार, सत्ताधाऱ्यांना दणका की पुन्हा संधी याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खासकरुन केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने या तिन्ही राज्यात विजय मिळविण्याचा चंग बांधला. त्यानुसार या तिन्ही राज्यांमध्ये प्रचार सभा, रोड शो याद्वारे जोरदार वातावरण तयार केले होते. या तिन्ही राज्यातील निकालाची ताजी आकडेवारी अशी
त्रिपुरा विधानसभा निवडणूक निकाल २०२३
एकूण जागा ६० ….. (बहुमतासाठी आवश्यक – ३१)
भाजप – ३३ (विजय), एकूण ३३ (-११). ४४ (२०१८ निवडणूक)
काँग्रेस + डावे – १४ (विजय), एकूण १४ (-२). १६ (२०१८ निवडणूक)
टीएमपी – १३ (विजय), एकूण १३ (+१३). ०० (२०१८ निवडणूक)
मेघालय विधानसभा निवडणूक निकाल २०२३
एकूण जागा – ५९ ….. (बहुमतासाठी आवश्यक – ३०)
एनपीपी – ७ (आघाडीवर), १८ (विजय), एकूण २५ (+५). २० (२०१८ निवडणूक)
काँग्रेस – ० (आघाडीवर), ५ (विजय), एकूण ५ (-१६). २१ (२०१८ निवडणूक)
भाजप – १ (आघाडीवर), २ (विजय), एकूण ३ (+१). ०२ (२०१८ निवडणूक)
टीएमसी – २ (आघाडीवर), ३ (विजय), एकूण ५ (+५). ०० (२०१८ निवडणूक)
इतर – २ (आघाडीवर), १९ (विजय), एकूण २१ (+४). १७ (२०१८ निवडणूक)
नागालँड विधानसभा निवडणूक निकाल २०२३
एकूण जागा – ६० ….. (बहुमतासाठी आवश्यक – ३१)
भाजपा – २ (आघाडीवर), ३५ (विजय), एकूण ३७ (+७). ३० (२०१८ निवडणूक)
काँग्रेस – ०० (आघाडीवर), ०० (विजय), एकूण ०० (००). ०० (२०१८ निवडणूक)
एनपीएफ – १ (आघाडीवर), १ (विजय), एकूण २ (-२४). २६ (२०१८ निवडणूक)
इतर – ४ (आघाडीवर), १७ (विजय), एकूण २१ (+१७). ४ (२०१८ निवडणूक)
Tripura Meghalaya Nagaland Election Result 2023