मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा तडकाफडकी राजीनामा

by India Darpan
मे 14, 2022 | 5:05 pm
in मुख्य बातमी
0
FStxxtxaAAEr7 y

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी शनिवारी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिप्लब कुमार देव यांच्या अचानक राजीनाम्याच्या वृत्ताने राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. त्रिपुरामध्ये बिप्लब कुमार देव यांची प्रतिमा भाजपचे मोठे नेते अशी आहे. अलीकडेच बिप्लब कुमार देव यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरून बिप्लब कुमार देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी त्रिपुरामध्ये भाजप आमदारांची बैठक होणार असून त्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाणार आहे. भाजप नेतृत्वाच्या वतीने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बिप्लब कुमार देव म्हणाले की, पक्ष प्रत्येक गोष्टीपेक्षा मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षासाठी काम केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने मी त्रिपुरातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. राज्यात शांतता, सुरक्षा आणि विकासाची हमी देताना मी कोरोनाच्या काळात राज्याला त्याच्या प्रभावापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या राजीनाम्याबाबत ते म्हणाले की, सर्व काही ठराविक वेळेसाठीच येते. आम्हीही त्या निर्धारित वेळेत काम करतो. मला मुख्यमंत्री म्हणून किंवा इतर कोणत्याही पदावर कुठेही पाठवले तर मी त्यासाठी तयार आहे.

त्रिपुरामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून बिप्लब कुमार देव यांच्या राजीनाम्याकडे राज्यातील भाजपचा आणखी एक प्रयोग म्हणून पाहिले जात आहे. गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंडच्या निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री बदलण्याचा प्रयोग भाजपने केला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये या कारणामुळे वारंवार होतोय वीजपुरवठा खंडीत

Next Post

नाशिक – जिल्हयातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post
carona 11

नाशिक - जिल्हयातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011