रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हुंड्यात बाईक नाही मिळाली; भरचौकात तीनदा तलाक म्हणत पत्नीला दिला घटस्फोट

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
fir

इंदूर (मध्य प्रदेश) – विवाह सोहळा अत्यंत मंगलमय मानला जातो, तर पती – पत्नीचे नाते अत्यंत पवित्र आणि दोन जिवांचे मिलन मानले जाते. परंतु काही वेळा विवाह सोहळा सुरू असताना रुसवे-फुगवे होतात. त्यातून लग्न मोडण्याच्या घटना देखील घडतात. अगदी क्षुल्लक कारणावरून देखील विवाह संबंध संपुष्टात आल्याचे आपल्याला दिसून येते. काहीवेळा नवरदेव हुंड्यासाठी अडून बसतो, वास्तविक हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु आजच्या आधुनिक काळातही सुशिक्षित तरुणांना लोभ सुटत नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि वाईट गोष्ट म्हणावी लागेल. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात घडली.

हुंड्यासाठी कबुल केलेली मोटारसायकल दोन वर्षानंतर देखील न मिळाल्यामुळे पतीने गावातीलच्या चौकात पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिला. अशा प्रकारे वैवाहिक संबंध संपवल्याच्या आरोपाखाली पतीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, इंदूरपासून सुमारे ३५ किमी अंतरावर असलेल्या केशरवर्दी येथील एका २२ वर्षीय महिलेला तिचा पती जोहर याने तिला गावातील भर चौकात “तलाक, तलाक, तलाक” म्हटले आणि त्यानंतर सांगितले की, दोघांचे वैवाहिक ताबडतोब संपुष्टात आणल्या गेले आहेत.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जोहर आणि त्याची आई तस्लीम हे तक्रारदार महिलेचा गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. कारण तिच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्यांना हुंड्यात मोटारसायकल दिली नाही. हुंड्याची कथित मागणी पूर्ण न केल्यामुळे महिलेला तिचा पती आणि सासू-सासऱ्यांकडून घटस्फोटाची धमकीही देण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. सदर महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा 2019 आणि तिच्या पतीकडून महिलेवर क्रूरता केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, बुधवारचे राशिभविष्य

Next Post

नवी दिल्ली-नाशिक विमानसेवेचे असे आहे वेळापत्रक

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नवी दिल्ली-नाशिक विमानसेवेचे असे आहे वेळापत्रक

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011