शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या त्या तिघांच्या अडचणी वाढणार; ‘अंनिस’ने केली ही मागणी

फेब्रुवारी 9, 2023 | 12:20 pm
in स्थानिक बातम्या
0
Trimbakeshwar Temple

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा होणे हे षडयंत्र असल्याचा अंनिसने केलेला दावा खरा ठरला आहे. बाहेरून बर्फ आणून पिंडींवर ठेवणाऱ्या व भाविकांच्या श्रद्धांशी खेळणाऱ्या तुंगार ट्रस्टच्या तिघां विरोधात गुन्हा नोंदवला गेला असला तरी, जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावावेत, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगावर बर्फाच्या थर जमा झाला. हा काहीतरी दैवी संकेत आहे, दैवी चमत्कार आहे, असा दावा करणारा व्हिडिओ प्रसार माध्यमातून दि. ३० जून २०२२ रोजी प्रसारित होत असल्याचे दिसले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील कार्यकर्त्यांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेऊन, घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा ही घटना मानवी हस्तक्षेपा शिवाय घडणे शक्य नाही, असे लक्षात आले. म्हणून त्या दिवसाच्या, त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत आणि दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्या अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त तसेच पोलीस निरीक्षक त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे यांना देण्यात आले होते.

मंदिरातील शिवलिंगावर बर्फ जमा होणे, ही घटना मानवी हस्तक्षेपा शिवाय शक्य नाही, हा महाराष्ट्र अंनिसचा अंदाज खरा ठरला आहे . कारण त्र्यंबकेश्वर मधील तुंगार ट्रस्टचे सदस्य यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. दोषींवर ह्या गुन्ह्यात इतर कलम लावलेले आहेत. मात्र जादूटोणाविरुद्ध कायद्याचे कलम लावलेले नाही. म्हणून इतर कलमांसोबतच दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्याचेही कलम लावावे आणि प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे असतानाही हा गुन्हा दाखल होण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी का लागला, याची सखोल चौकशी करून, संबंधित दोषींवरही कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह, कृष्णा चांदगुडे व त्र्यंबकेश्वर शहर कार्याध्यक्ष, संजय हरळे यांनी केली आहे.

Trimbakeshwar Temple Trustee Trouble Anis Demand

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! त्र्यंबकराजाच्या पिंडीवरील ‘त्या’ बर्फाचे गूढ उकलले; तिन्ही विश्वस्तांवर गुन्हे दाखल

Next Post

शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचा नागरी सत्कार व गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
20230209 133536 1 scaled e1675930071832

शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचा नागरी सत्कार व गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011