नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कालावधी 3 जुलै,2023 रोजी संपुष्टात येत असून विश्वस्त मंडळामध्ये 4 भाविक प्रतिनिधी विश्वस्तांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषगांने इच्छुक, योग्य व पात्र व्यक्तिंनी नेमणुकीकरिता विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, जानकी प्लाझा, पहिला मजला नाशिक – पुणे रोड, नाशिक येथे करावा, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक शि.ना.दुतोंडे यांनी केले आहे.
विश्वस्त मंडळामध्ये 4 भाविक प्रतिनिधी विश्वस्तांची नेमणुकीबाबतची अधिसूचना 26 मे,2023 रोजी जारी करण्यात आली आहे. सदरची अधिसूचनेची एक प्रत, अर्जाचा विहीत नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, नाशिक, त्र्यंबकेश्वर देवस्थान, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि महानगरपालिका, नाशिकच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे.
Trimbakeshwar Temple Trust Trustee Application