नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयात नेमणूक असलेले शासकीय वाहन चालक अनिल बाबुराव आगिवले हे दीड लाख रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांनी साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांच्याकडून लाच घेतली.
तक्रारदार यांनी मौजे शिरसाठे तालुका इगतपुरी येथे गट नंबर १७६ मधील शेतजमीन विकत घेण्याकरिता विसार पावती नोटरी केली होती. सदर शेत जमिनीच्या संदर्भात तत्कालीन उपविभागीय अधिकारी इगतपुरी त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वाद चालू होता. सदर वादाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात आगिवले यांनी दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी ५० पूर्वी घेतल्याचे त्यांनी मान्य केले. त्याचप्रमाणे उर्वरित १ लाख ५० रुपये लाचेची रक्कम आगिवले यांनी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांचे कडून ४ मार्च २०२३ रोजी स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, सापळा पथकातील पोलिस हवालदार पंकज पळशीकर ,प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांनी ही कारवाई केली.
यशस्वी सापळा
*युनिट – ला.प्र.वि. नाशिक
*तक्रारदार- पुरुष, वय 34 वर्ष. रा. वाडीवरे, ता. नाशिक, जिल्हा नाशिक.
*आलोसे- श्री. अनिल बाबुराव आगिवले , वय- 44 वर्ष, नेमणूक तहसील कार्यालय त्रंबकेश्वर,
संलग्न उपविभागीय कार्यालय इगतपुरी त्रंबकेश्वर (शासकीय वाहन चालक )
*लाचेची मागणी- 2,00,000/-रु. दि. 24/ 02/2023 दि. 27/02/2023
*लाच स्विकारली-
1,50,000/-रु. दि.04/03/2023
*हस्तगत रक्कम*-
1,50,000/ रुपये.
*लाचेचे कारण –
यातील तक्रारदार यांनी मौजे शिरसाठे तालुका इगतपुरी येथे गट नंबर 176 मधील शेतजमीन विकत घेण्याकरिता विसार पावती नोटरी केली होती. सदर शेत जमिनीच्या संदर्भात तत्कालीन उपविभागीय अधिकारी इगतपुरी त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वाद चालू होता. सदर वादाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात यातील आलोसे यांनी दिनांक 24/02/2023 रोजी 2,00,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 50,000/- पूर्वी घेतल्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे उर्वरित 1,50,000/- रुपये लाचेची रक्कम यातील आलोसे यांनी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांचे कडून दि 04/03/2023 रोजी स्वीकारली म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत
*सापळा अधिकारी-
संदीप साळुंखे , पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.
*सापळा पथक-
पो. ह. पंकज पळशीकर
पो.ना. प्रकाश महाजन
पो. ना. नितीन कराड
पो. ना. प्रभाकर गवळी
सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नाशिक
*मार्गदर्शक-
1) मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी
मा. जिल्हाधिकारी नाशिक जिल्हा.
—————————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*,