त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील तलाठी संतोष शशिकांत जोशी आणि कोतवाल रतन सोनजी भालेराव हे दोन्ही यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात या दोघांनी दोन हजार रुपयाची लाच घेतली. हे दोघे रंगेहाथ सापडले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याने जमीन खरेदी केली. सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात तलाठी व कोतवाल यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर लाच रक्कम दोन हजार रुपये तलाठी जोशी आणि कोतवाल भालेराव यांना तलाठी कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे पंच साक्षीदारास समक्ष स्वीकारली. त्यावेळेस त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
सापळा अधिकारी
मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, मो.न. 9921252549
*सापळा पथक*-
पो. ना. प्रवीण महाजन
पो. ना. नितीन कराड,
पो. ना. प्रमोद चव्हाणके
चालक पोहवा संतोष गांगुर्डे
मार्गदर्शक*
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.*
दुरध्वनी क्रमांक- 02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४ .