नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आदिवासी पर्यटन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई -राठोड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
उपसंचालक पर्यटन संचालनालय,नाशिक कार्यालयामार्फत नाशिक विभागत नाशिक,धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी विविध कार्यक्रम व महोत्सवांचे आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक इच्छुक, अनुभवी व नोंदणीकृत संस्था, व्यक्ती, व कार्यक्रम व्यवस्थापकांनी बुधवार, 27 जून, 2023 पर्यंत पर्यटन भवन, शासकीय विश्राम गृह आवार, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक संपर्क फोन नंबर 0253-2995464 येथे संपर्क साधावा, असे उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक श्रीमती. सरदेसाई- राठोड यांनी कळविले आहे.