पेठ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पेठ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वरील चाचडगाव नजिक टोल नाक्यावर संतप्त आदिवासी बांधवांनी आज रास्ता रोको केला. सर्वपक्षीय पाठिंबा लांबलेला हा रास्ता रोको तब्बल तीन तास चालला. अखेर या आंदोलनाची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात आदिवासी बांधवांना त्याचा दिलासा मिळणार आहे.
स्कॉलर्स इन्फ्रा ही कंपनी हा टोल नाका चालवते आहे. नाशिक ते पेठ या रस्त्याचे ५३.५१५ किलोमीटर अंतराचे काम पुर्ण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले असले तरी या टोल नाक्याच्या परिसरातील २० किलोमीटर अंतरावरील वाहनधारकांना टोल मधुन सुट देण्यात येणार असल्याचे सांगितले जायचे मात्र असे असले तरी या टोल नाक्यावर सुट मिळत नसुन याच मुद्द्यावर येथील कर्मचारी व वाहन धारकांत दररोज वाद होत असतात. तर येथील कर्मचारीही वाहन धारकांशी अरेरावी करत आहेत.
पेठ ते चाचडगाव टोल नाका २३ किलोमीटर अंतरावर आहे पेठ तालुक्यातील व परिसरातील आदिवासी शेतकरी तसेच वाहन धारक यांना टोल माफ करण्यात यावा या प्रमुख मागणी सह या मार्गावरील सावळघाट व कोंटबी घाटातील रस्त्याची दुरावस्था व पडलेले खड्डे यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत सावळघाट व कोंटबी घाटातील अपघाती वळणे काढुन रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे व तात्कळ दुरूस्ती व्हावी.
पेठ शहरा नजिक हट्टीपाडा या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत या ठिकाणी एकेरी रस्ता असुन त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करून शहरातुन जाणारा महामार्ग त्याचे बायपासचे काम लवकर करुन ही सर्व कामे करून मगच या मार्गावर टोल वसुली करण्यात यावी.या मागण्यासाठी येथील टोल नाक्यावर सकाळी अकरा वाजेपर्यंत पासुन रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले होते.
आंदोलना दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे व टोल प्राधिकरणाचे अधिकारी व पेठ दिडोंरीचे प्रांत अधिकारी संदीप आहेर व पोलीस उपअधिक्षक अमोल गायकवाड यांचे उपस्थित राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता पालवे व उपअभियंता मनोज पाटील व टोल प्राधिकरणाचे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून पेठ तालुक्यातील व परिसरातील वाहन धारकांना टोल मध्ये सुट देण्या बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल तसेच रस्ता दुरुस्तीचे किरकोळ कामे सुरू आहेत व काही कामे पाऊस कमी होताच पुर्ण करण्यात येतील . त्यांच्या आश्वासन नंतर तब्बल तीन तास सुरू असलेला रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले
या मुद्द्यावर पेठ दिडोंरी सुरगाणा येथील सर्वच राजकीय पक्ष एकवटले असुन महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पोलीस उपअधिक्षक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे ,वाघ, धनंजय शिलावटे,गायकवाड, दिलीप रहेर, जाधव,पेठ व दिंडोरी पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवत वाहतुक सुरळीत चालु केली.
या आंदोलनाचे नेतृत्व पेठ तालुक्यातील शिवसेनाप्रमुख भास्कर गावीत यांनी केले. यावेळी माजी आमदार धनराज महाले माजी नगराध्यक्ष मनोज घोंगे,नगराध्यक्ष करण करवंदे,समता परिषदेचे संतोष डोमे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामु राऊत, कार्याध्यक्ष रामदास गवळी , नगरसेवक रामदास गायकवाड, गणेश गावीत,सुयोग गवळी,काँग्रेसचे विशाल जाधव,भिका चौधरी, एकनाथ भोये, विलास जाधव ,याकुब शेख महीला आघाडीच्या राधा राऊत, अरूणा वार्डे, नगरसेविका लता सातपुते,दुर्गा दरोडे,नगरसेविका रामेश्वरी व्यवहारे , सेना शहराध्यक्ष गणेश शिरसाठ, माजी उपसभापती तुळशिराम वाघमारे,यशवंत गवांदे,माकपचे जाकिर मनियार, युवा सेना अध्यक्ष किरण भुसारे,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जाधव नगरसेवक युवराज लिमले,सेनेचे जेष्ठ नेते पुंडलिक महाले,बापु पाटील, नंदु गवळी ,राजु गवांदे, गणेश गवळी, कांतीलाल राऊत, राजेंद्र कहाणे,भरत पवार,कुमार, मोंढे,त्र्यंबक कामडी, भाजपाचे संजय वाघ,राहुल सातपुते,पांडु जाधव, किरण कोरे ,सुरेश पवार,मनसेचे शाम काळे,गिरीश महमाने,विकी बिरार,इनायत शेख, संतोष करवंदे, प्रकाश चव्हाण,संतोष खैरनार,वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Trible Peoples Agitation at Paint Toll Naka
National Highway Chapadgaon