शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीला मासिक पाळीत वृक्षारोपणास मनाई प्रकरण: अहवालातून उघड झाली ही धक्कादायक बाब

by India Darpan
ऑगस्ट 2, 2022 | 2:11 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृतसेवा) – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव शासकीय आश्रमशाळेत गेल्या आठवड्यात विद्यार्थिनीला मासिक पाळीत वृक्षारोपण करण्यास मनाई करण्यात आली होती. राज्यभरात हा विषय चर्चेचा ठरला होता. मात्र प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थिनीबाबत असा काही प्रकार घडलाच नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. शाळेत वृक्षारोपण झाले त्या दिवशी संबंधित विद्यार्थिनी गैरहजर असल्याचं समितीने केलेल्या चौकशीत आढळून आले.

सदर मुलीने केलेली ही तक्रार बनावट असल्याचे अहवालाअंती समोर आले आहे, सतत गैरहजर असल्यामुळे तिला बारावीचे वर्ष वाया जाण्याची भीती होती. विज्ञान शाखेत शिकत असूनही ती गैरहजर असल्याने वर्गशिक्षकाने तिला जाब विचारला होता. तसेच यापुढे शाळेत बसू न देण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे विद्यार्थिनीने कारवाईच्या भीतीपोटी मासिक पाळीमुळे आपल्याला वृक्षारोपणापासून रोखल्याचा बनाव केला असण्याची शक्यता चौकशी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यामधील मासिक पाळी प्रकरणाने धक्कादायक वळण घेतल्याचे उघड झाले आहे. मासिक पाळी सुरु असल्यामुळे एका विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास शिक्षकाने मनाई केली होती. सदर घटनेचा तीव्र निषेध करत विद्यार्थिनीने आधी पालकांकडे आणि नंतर आयुक्तांकडे याविषयी तक्रार दाखल केली होती. मुलीच्या तक्रारीनंतर या विषयी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

मासिक पाळी आली असल्याचे कारणातून आश्रमशाळेच्या शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याचा आरोप देवगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने श्रमजीवी संघटनेकडे केल्यानंतर संघटनेच्या वतीने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त यांच्याकडे केली होती.या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाकडून देखील घेण्यात आली असून, या प्रकरणी कारवाई करत अहवाल आयोगास सादर करण्याची सूचना केली होती,

या आश्रम शाळेत पावसाळ्यात येथील कन्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनींकडून परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र एका विद्यार्थिनीला शिक्षकांनी झाड लावण्यापासून रोखले. तुझी पाळी सुरु आहे. तू झाड लावलंस तर ते झाड मरेल, असा अजब तर्क या कथित शिक्षकाने लावला. तसे कारण सांगून विद्यार्थिनीला बाजूला ठेवले. घडल्या प्रकाराचा संताप आल्याने सदर विद्यार्थिनीने घरी पालकांना हा किस्सा सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने पालकांच्या सांगण्यावरून आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले होते.

दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही शिक्षकांचे असे विचार असल्यावरून संताप व्यक्त केला गेला. याविषयी आदिवासी आयुक्तांमार्फत चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशीनंतर समितीने सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाब उघड झाली आहे. आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आणि बालहक्क संरक्षण आयोग सायली पालखेडकर यांचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्तांकडे सादर केला आहे. दोन महिन्यांपासून ही विद्यार्थिनी सतत गैरहजर होती. या कारवाईच्या भीतीतून विद्यार्थिनीने आरोप करताना या प्रकरणाचा बनाव केला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणी यांनी सदर प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मीना यांनी शाळेचा हजेरी पट तपासला असता, ज्या दिवशी वृक्षारोपण झाले, त्याच दिवशी म्हणजे 14 जुलै रोजी विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती, असे आढळून आले. तसेच ती विद्यार्थिनी जून महिन्यात चार दिवस तर जुलै महिन्यात फक्त तीन दिवस शाळेत उपस्थित होती, असे चौकशीतून उघड झाले आहे. सदर विद्यार्थिनी आदिवासी विभागात काम करणाऱ्या एका राजकीय पक्ष संघटनेची सदस्य आहे.

शाळेच्या एका शिक्षकाने १२ वी विज्ञानशाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस ऐकवले आणि तिला झाडाचे रोप लावण्यास मनाई केली असल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत मानसिक ठेच पोहोचलेल्या या विद्यार्थिनीने श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान मधे यांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार कथन केला. मधे यांनी तातडीने आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांना दूरध्वनीवरून घडलेला प्रकार सांगितला. देवगाव येथील शासकीय आश्रमशाळा सर्वात जुनी आश्रमशाळा म्हणून परिचित आहे. इयत्ता पहिली ते बारावीच्या सुमारे ४०० मुली येथे शिक्षण घेतात. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाविषयी संभ्रम निर्माण झाला असून अशाप्रकारे विद्यार्थिनी जर खोटे बोलून शिक्षण शैक्षणिक क्षेत्रात खळबळ निर्माण करत असेल तर चुकीचे आहे असे मत येथील काही शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

Trible Girl Tree Plantation Controversy Enquiry Committee Report

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकनाथ शिंदे स्वतःच्याच नावाच्या उद्यानाचे करणार होते उदघाटन, पण….

Next Post

नगरसुल येथील अंडर पासची समस्या लवकरच दूर होणार..(व्हिडीओ)

Next Post
20220802 152233

नगरसुल येथील अंडर पासची समस्या लवकरच दूर होणार..(व्हिडीओ)

ताज्या बातम्या

IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
IMG 20250509 WA0316 1

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर…महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही माहिती

मे 9, 2025
Untitled 20

आतापर्यंत भारत – पाक सीमेवर नेमकं काय घडलं?…पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मे 9, 2025
Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011