नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात लाचखोरीचे कीड चांगलीच फोफावल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात दिवसेंदिवस विविध सरकारी कर्मचारी आणि अधिकारी सापडताना दिसत आहेत. आता एसीबीच्या जाळ्यात आदिवासी विकास विभागातील मोठा मासा गळाला लागला आहे. विभागातील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुल याला तब्बल २८ लाख रुपयांची लाच धेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी भागात मध्यान्ह भाेजन (सेंट्रल किचन) कक्ष उभारायचा होता. त्याचे बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला २ काेटी ४० लाख रूपयांचे कार्यारंभ आदेश देण्यात येणार होते. हा आदेश देण्यासाठी बागुल याने या रकमेच्या १२ टक्के रकमेची मागणी केली. तडजोडी अंती २८ लाख ८० हजार रुपये निश्चित झाले. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. विशेष पथकाने या प्रकरणावर बारकाईने नजर ठेवली. अखेर बागुल याच्या निवासस्थानी पैशांच्या देवाणघेवाणीचे निश्चित झाले. त्यानुसार एसीबीने तेथे सापळा लावला. आणि बागुल हा आपल्याच निवासस्थानी तब्बल २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. याप्रकरणी बागुल विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.
Trible Department Executive Engineer Bribe ACB Raid
Dineshkumar Bagul Crime Corruption