विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह झालेल्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. वेगवेगळ्या संशोधनात ही गोष्ट सिद्ध झाली आहे. कोरोना रुग्णांबाबतच्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर त्याचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये १३.४ टक्के रुग्णांना मधुमेह झाल्याचे उघड झाले आहे.
सायन्स जनरल अॅल्सेवियर या नियतकालिकेत एम्सच्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, ज्यांना आधी मधुमेह नव्हता, परंतु कोरोना संसर्गानंतर मधुमेह झाला अशांमध्ये गंभीर ग्लेसेमिया आढळला आहे. कोरोना रुग्णांना होणार्या हायपरग्लेसेमियाच्या उपचारांबाबत विविध पद्धतींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वात सुरक्षित आणि प्रभावी डीपीपी-४ इन्हिबिटर आढळला आहे.
डीपीपी-४ इन्हिबिटरमध्ये आढळणारे सीटाग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन तसेच विंडाग्लिप्टिन हे घटक रक्तातील साखरेच्या पातळीला कमी करण्यास मदत करतात. जनरल ऑफ ड्रग रिसर्चमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, डीपीपी-४ इन्हिबिटरचा नैसर्गिक स्त्रोत दारुहरिद्रा नावाचे औषधी रोप आहे.
काउंसिल ऑफ साइंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) च्या लखनऊ स्थित नॅशनल बॉटेनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबाआरआय) या प्रयोगशाळेचे वैज्ञानिक डॉ. ए. के. एस. रावत यांच्या माहितीनुसार, त्यांच्या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेल्या मधुमेहावरील औषध बीजीआर-३४ मध्ये दारुहरिद्राचा विशेष वापर करण्यात आला आहे.
एनबीआरआयच्या संशोधकांनी दारुहरिद्राच्या मधुमेह बरा करण्याच्या गुणांबाबत सविस्तर संशोधन केले आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. रावत यांच्या माहितीनुसार बीजीआर-३४ मध्ये दारुहरिद्राशिवाय हायपरग्लेसेमियाला नियंत्रित करणारे आणखी दोन तत्व आहेत. त्यापैकी एका गुडमारच्या औषधीय रोपातून मिळाणारा जिमनेमिक अॅसिड आणि मेथीमध्ये आढळणारे ट्रिगोनोसाइड आयबी.
केम रेक्सिव्ह नियकालिकेत नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात म्हटले आहे, की जिमनेमिक अॅसिड मधुमेही रुग्णांमधील हायपरग्लेसेमियाला रोखण्यास मदत करतो. अशाच प्रकारे मेथीमध्ये आढळणारे ट्रिगोनोसाइड आयबीसुद्धा हायपरग्लेसेमियाविरुद्ध लढा देण्यास मदत करते. याबद्दलचे सविस्तर संशोधन एनव्हायर्नमेंटल चॅलेंजेस या नियतकालिकेत प्रकाशित झाले आहे.