विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतात आजही अनेक प्रशासकीय विभागांमध्ये इंग्रजांच्या काळातील कायदे आणि नियम वापरले जातात. पण स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी दिलेली शिक्षा आजपर्यंत कुणी भोगत आहे, असे एेकल्यास नवलच वाटेल. पण हे सत्य आहे. भारतीय रेल्वेतील टीटीई म्हणजेच ट्रॅव्हलिंग टिकीट एक्झामिनर आजही इंग्रजांनी दिलेली शिक्षा भोगत आहेत.
स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान क्रांतीकारकांना सीटखाली लपवून घेऊन जाण्यासाठी टीटीला दोषी ठरविण्यात आले होते. त्यानंतर १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने टीटीकडून रनिंग स्टाफचा दर्जा काढून घेतला होता. नंतरच्या काळात भारतापासून वेगळे झालेले बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी १९६२ मध्ये टीटींना रनिंग स्टाफचा दर्जा पुन्हा बहाल केला. मात्र भारतातील रेल्वेच्या १७ झोनमध्ये कार्यरत २८ हजार टीटी आजही इंग्रजांनी दिलेली शिक्षा भोगत आहेत.
