नाशिक – ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलतरण सिंग अटवाल, वेस्ट झोन उपाध्यक्ष विजय कालरा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात ज्याचा माल त्याचा हमाल हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा २०१६ च्या परिपत्रकानुसार हमाली वराई ही ज्याचा माल असेल त्यांनीच देणे अनिवार्य आहे. असे असून सुद्धा व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती हे हमाली वाहन मालकांकडून वसूल करतात. याविषयी वेळो वेळी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस नाशिक टीमने जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांना निवेदन दिले होते परंतु तरी पण अवैध हमाली वराई घेणे बंद झाले नाही म्हणून ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलतरण सिंग अटवाल यांनी संपूर्ण देशात ज्याचा माल त्याचा हमाल या निर्णयाची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेस नाशिक टीमची बैठक २७ जुलै रोजी नाशिक येथील कार्यालयात पार पडली बैठकीत सर्व संमतीने संपूर्ण जिल्ह्यांत दिनांक ५ आॅगस्टमपासून हमाली वराई कोणत्याही व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांना वाहन मालकांकडून वसूल करू देणार नाहीत .ज्याचा माल त्याचा हमाल हा निर्णय घेण्यात आला. जर कोणताही व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती वाहन मालकांना हमाली देण्यास वेठीस धरत असेल तर वाहन मालकांनी, चालकांनी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस नाशिक टीमशी संपर्क साधावा.
बैठकीस ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेस नाशिकचे अध्यक्ष सचिन जाधव, अंजु सिंघल, अवतार सिंग बिर्दी, संजय तोडी, रामभाऊ सूर्यवंशी, किरण भालेकर, विनायक वाघ, परवेज पठाण, प्रविण अग्रवाल, सोनू शर्मा, ज्ञानेश्वर वरपे, एस. एन. शर्मा, रतन अग्रवाल, अतुल रावल, विनोद शर्मा, पवन शिरसागर, सचिन खैरनार, राजू पवार , तुषार गायकवाड, संदीप करांडे, हेमंत सिंग, भाऊसाहेब सोनवणे हे पदाधिकारी उपस्थित होते. व्यापारी, उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी कोणतीही गाडी माल भरण्यासाठी बुकिंग करतांना हमाली वराई वाहन मालक देणार नाही हे लक्षात घेऊन त्याचे भाडे ठरवावे व ज्याचा माल त्याचा हमाल हा निर्णय लक्षात घेऊन व्यवहार करावा.