इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशात भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात सध्या छापेमारी सुरू आहे. याच एक भाग म्हणून आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) जबलपूर येथील वाहतूक अधिकारी संतोष पॉल याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात संतोष पाल हा चक्क धन कुबेर निघाला आहे. त्याच्या घरातून तब्बल ६०० पट अधिक उत्पन्नाचा खुलासा झाला आहे.
ईओडब्ल्यूच्या छापामारी कारवाईत संतोषकडून ६ आलिशान घरे, १ फार्म हाऊस, २ कार आणि १ मोटार सायकल जप्त करण्यात आली. आणि ही सर्व संपत्ती काळ्या पैशातून कमावल्याचे सांगितले जात आहे. आजपर्यंतच्या कार्यवाहीमध्ये, EOW ने १६ लाख रुपये रोख, सोने, चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पाल यांचे १० हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलेले आलिशान घर पाहून ईओडब्ल्यू टीमही हैराण झाली. तळघर असलेल्या तीन मजली घरात सर्व काही आलिशान होते. घरातील लिफ्टपासून ते लाकडी दारु ठेवण्यापर्यंत महागडी दारू, बाग, स्विमिंग पूल, झुंबर, थिएटर अशा अनेक गोष्टी घरात दिसत होत्या.
न्यायालयाच्या आदेशानंतर ईओडब्ल्यूने संतोषच्या घरावर छापा टाकला. ज्यासाठी विशेष न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. संतोषविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता संतोष पॉल आणि त्यांची पत्नी रेखा पॉल यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संतोषला घरावर छापे मारल्याची माहिती होती. त्यानंतर संतोषने काही चैनीच्या वस्तू दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ईओडब्ल्यूच्या 30 सदस्यीय पथकाला रात्री उशिरा छापा टाकावा लागला.
त्याचवेळी पोलीस अधीक्षक ईओडब्ल्यू म्हणाले की, शोध सुरू आहे. आरोपींच्या मालमत्तेचे मुल्यांकन जे काही मालमत्ता असेल, कागदपत्रे सोबत असतील त्या आधारे केली जाईल. तसेच संतोष पाल आणि त्यांची पत्नी रेखा पाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईवेळी संतोष पोळ यांची पत्नी रेखा पाल घरात उपस्थित नव्हती. त्यानंतर एआरटीओ संतोष पाल यांनी आवश्यक कागदपत्रे आणि सामान कुठेतरी लपवून पाठवले असल्याची भीती टीमला वाटते.
https://twitter.com/ndtv/status/1560110801389641729?s=20&t=CZ6ycGkp7TB1mp_AWgddtQ
Transport Officer EOW Raid 600 times Asset
Madhya Pradesh MP Gold Wealth Money Corruption