नाशिक – पेट्रोल डीझेलची झालेली प्रचंड दरवाढ, भाडेवाढीचा न झालेला निर्णय या सह अनेक प्रश्नांमुळे वाहतूकदार अडचणीत असतांना हमालीचा बोजा देखील वाहतूक दारांना सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मालवाहतूक करतांना लागणाऱ्या हमालीची पूर्ण जबाबदारी संबंधित मालकावर राहणार असल्याचा निर्णय नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशने घेतला आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांनी आयामा, निमा,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स महाराष्ट्रसह नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील दळण वळनात वाहतूकदारांचा प्रामुख्याने मोठा सहभाग आहे यात वाहतूक करण्या सोबत असंख्य अडचणी आहे यात हमाली व वाराई वाहतूक दारानाच करावी लागते माल वाहतूक करणे ही प्रमुख जबाबदारी असून त्यात एक जागेहून दुसऱ्या जागेत माल नेत असताना विविध गाव,जिल्हे, राज्य अशी वाहतूक करावी लागते त्यात हमाली व वराई साठी वाहन चालकास सक्ती करण्यात येते बाहेर गावाहून आलेला हा वाहन चालक ही सर्व व्यवस्था करणे त्याला शक्य होत नाही म्हणून त्याची खुप लूट होत असल्याचे म्हटले आहे.
ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मालवाहतूक करतांना गाडी भरण्यासाठी लागणारी हमाली, वाराई माल उतरविण्यासाठी लागणारी हमाली, वाराई याचा भार गाडी मालक व ट्रान्सपोर्ट चालकांना सहन करावा लागतो. याचे सर्व खर्च अकाऊंट मध्ये येऊन त्याने ट्रांजेक्षन वाढते त्याचा तोटा विनाकारण भारावा लागतो. तसेच मालवाहतूक करतांना अनधिकृत हमाली घेतली जाते. त्यामुळे वाहतुकदारांना माल वाहतूक करतांना नाहकच आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच कांदा,द्राक्ष व्यापारी व कंपनी मालकांची मनमानी कारभारालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहतूकदार अनेक अडचणींचा सामना करत असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, वास्तविक मालाची वाहतूक करतांना माल भरण्याची आणि उतरविण्याची जबाबदारी ही पूर्णपणे त्या मालाच्या मालकाची असते. मात्र त्याचा नाहक भुर्दंड गाडी मालक व ट्रान्सपोर्टर यांना सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूकदार संघटनेच्या वतीने याबाबत माल भरणे व उतरविण्याची पूर्ण जबाबदारी ही मालाच्या मालकाची असणार असल्याबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूकदार यापुढे गाडीत माल भरणे तसेच उतरविणे याचे कुठलेही पैसे भरणार नाही असा निर्णय याबाबत सर्व संघटनानी घेतला आहे याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.