नाशिक – ऑक्सिजन सिलेंडरची निःशुल्क वाहतूक करण्याचा निर्णय ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने घेतला आहे.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने वाढत्या कोविड १९ महामारीच्या संकटामुळे निर्णय घेतला आहे की, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर अशा ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था कमी पडत असल्यास ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस सदैव लोकसेवेसाठी तत्पर राहिल. कोणतेही हॉस्पिटल कोविड सेंटर, सामाजिक संस्था यांना ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करण्यासाठी अडचण येत असेल तर त्यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी संपर्क करावा. आमच्या तर्फे ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करण्यासाठी वाहने निशुल्क दिले जातील, असे काँग्रेसने म्हटले आहे.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या निर्णयाची माहिती मेलद्वारे जिल्हाधिकारी नाशिक, विभागीय आयुक्त नाशिक ,नाशिक महानगर पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त नाशिक यांना कळविण्यात आली ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कोणत्याही मदतीसाठी सदैव प्रशासनाबरोबर राहील.
लोकसेवेसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसची टीम २४/७ उपलब्ध राहील.
संपर्क – सचिन जाधव मो.9607985000, 8999193350
अंजु सिंघल मो.9762666285, 9422248285
अवतारसिंग बिर्दी मो.9595702070
अनिल कौशिक मो.8208290323
विनायक वाघ मो.9096966999
किरण भालेकर 9860004878
सचिन जाधव, अध्यक्ष, नाशिक जिल्हा, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस. मो. 9607985000