नाशिक – डिझेल दरवाढ, रोड टॅक्स माफी, भ्रष्टाचार विरोधात ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्टतर्फे ब्लॅक डे पाळण्यात आला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलतरण सिंग अटवाल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन संपन्न झाला. पालकमंत्री, खासदार व जिल्ह्ाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात भ्रष्टाचार विरोधात मीटिंग झाली व रेडियम रिफ्लेक्टर याच्या बाबतीत चर्चा झाली. जुने रेडियम रिफ्लेक्टर चांगल्या स्थितीत असेल तर नवीनची गरज नाही. तसेच नवीन रेडियम रिफ्लेक्टरच्या किमती कमी करण्यात याव्या या बद्दल सकारात्मक चर्चा झाली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी अॉल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसचे निवेदन रिफ्लेक्टर रेडियमच्या किंमती कमी करण्यात याव्या हे निवेदन परिवहन आयुक्त पाठवू असे सांगितले.
ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेस ने ब्लॅक डे पाळून केंद्र व राज्य सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्यात नाही तर राष्ट्रीय बैठक जुलै महिन्यात घेऊन देशात चक्काजाम ऑगस्ट महिन्यात करण्यात येईल असा इशारा दिला. या वेळचा चक्काजाम हा ऐतिहासिक चक्काजाम असेल अशी चेतावणी दिली. यावेळी संस्थेचे नाशिक , धुळे जिल्हा अध्यक्ष सचिन जाधव, अंजु सिंघल, अवतार सिंग बिरदी,परवेज पठाण, विश्वास तांबे, किरण भालेकर, विनायक वाघ, ज्ञानेश्वर वरपे, वेध प्रकाश झाझरीया, राजेश पवार, दिलीपसिंह बेनिवाल, बिपीन पांडे हे पदाधिकारी उपस्थित होते.